• प्रकरण महिला सरपंच-सदस्यातील हाणामारीचे ; ग्रामस्थांचे कार्यकारी अधिका-यांना निवेदन
तुमसर:-

सिहोरा जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणा-या सिलेगाव ग्राम पंचायतीत घडलेल्या महिला सरपंच सदस्यातील हाणामारीतून ग्रामसेविकेची बदली करण्यात आली आहे. त्या बदलीला तत्काळ स्थगिती देवून ग्रामसेविका मंजुशा शाहारे यांना पुर्ववत सिलेगाव येथे रुजू करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. त्या संदर्भात सिलेगाव ग्रामस्थांनी मंगळवारला जिल्हा परिषद भंडाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. ग्राम सेविका मंजुषा शहारे यांची बदली रद्द न झाल्यास सिलेगाव ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा ईशाराही देण्यात आलेला आहे. मात्र याप्रकारे एखाद्या ग्राम सेविकेच्या बदलीला थांबविन्याकरीता होणारे प्रयत्न हे तालुक्यात प्रथमच केले जात आहे. त्यात निवेदनात शहारे यांच्या गाव सेवेशी संपुर्ण गावकरी संतुष्ट व समाधानी असल्याचीही नोंद करण्यात आली आहे,ह मात्र विशेष!
सिलेगाव ग्रामपंचायतीच्या आवारात ६ जुनच्या दुपारी प्रोसिडींग बुक अनधिकृतरित्या सरपंचांनी घर घेवून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आक्षेप घेवून ग्राम सेविका मंजुषा शहारे यांनी सरपंचांचा विरोध केला होता. सदर विरोध जातीवाचक शिविगाळापर्यंत पोहचून शाब्दीक चकमक चक्क हाणामारीत रुपांतरीत झाली होती. सदर प्रकरण सिहोरा पोलीस स्थानकात चांगलाच गाजला होता. सरपंच तथा ग्रामसेवक संघटना आप-आपल्या हितैषींच्या बचावाकरीता आमोरो सामोरही आले होते. दरम्यान संबंधित महिला सरपंच तथा इतर सदस्यांविरुद्ध सिहोरा पोलीसांनी घटनेची नोंद अनुसुचित जाती अन्याय प्रतिबंध कायद्यान्वये केली होती. सध्या प्रकरण न्याप्रविष्ठ आहे. मात्र तुमसर पं.स. चे खंड विकास अधिकारी यांनी २५ जूनच्या पत्र क्रमांक पंसतु/पंचा/आस्था/वस/२९५/२०२१ नुसार ग्राम सेविका मंजुषा शहारे यांच्या बदलीचे आदेश काढले आहे. त्यात शहारे यांना २८ जूनला पंचायत समिती तुमसर येथे कोव्हिड-१९ च्या कामकाजाकरीता तात्पुरती सेवा देण्याचे नमुद करण्यात आले आहे.
पंचायत समिती तुमसरचे खंड विकास अधिकारी धिरज पाटील यांच्या त्या आदेशाला चक्क सिलेगावच्या गावक-यांनी आवाहन दिले आहे. अधिका-यांना सादर केलेल्या निवेदनात गावक-यांनी शहारे यांच्या सेवेने ग्रामस्थ समाधानी असून फक्त गावातील सरपंच परिवाराला त्यांचा त्रास असल्याचे नमुद आहे. मंजुषा यांच्यामुळे सिलेगावात अवैध कामांवर आळा बसल्याने त्यांच्या विरोधकांनी रचलेला हा कटकारस्थान आहे. सदर आदेश तत्काळ रद्द करुन शहारे यांची बदली थांबविन्याकरीता ग्रामस्थांनी जिल्हा परिषद भंडारावर धडक दिली आहे. त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करुन बदलीचे आदेश रद्द न झाल्यास आंदोलनाचाबी ईशारा देण्यात आलेला आहे. निवेदन सादर करतांना सुमित पेरे, दिनद्याल पटले, हरिचंद खरवडे, सुदाम शहारे, प्रदिप पेरे, शेखर रहांगडाले, शैलेश मते, रामू मुकुरने शेकडों ग्रामस्थ उपस्थित होते.