Tuesday, June 28, 2022
Homeभंडाराजिल्हयात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला

जिल्हयात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला

भंडारा :
कोरोना महामारिचा प्रकोप सहन करत नाही तो आता भंडारा जिल्ह्यात डेंग्यू थैमान घातले आहे. भंडारा जिल्ह्यात तब्बल डेंग्यूचे 13 रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आराेग्य विभागाद्वारे घेण्यात आलेल्या 250 लोकांच्या नमूण्यात 13 रुग्ण डेंग्यूचे सापडले आहेत.


विशेष म्हणजे यावर्षी जून महिन्यापर्यंत सात रुग्ण तर जुलै महिन्यात सहा रुग्णांची भर पडली आहे.ह्या सर्व रुग्णांचा उपचार भंडारा सामान्य रुग्णालयात सुरु आहे. डेंग्यू हा एडीस इजिप्ती मादी डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा डास चावल्यावर आपल्या शरीरात विषाणू तयार करायला 7 ते 8 दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो अशी माहिती आराेग्य विभागातील कर्मचा-यांनी दिली.
दरम्यान आधीच कोरोना रोखताना जिल्हा प्रशासनाची पुरती तारांबळ उडाली असताना आता डेंग्यूच्या प्रकोपाने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे.
कशी घ्यावी काळजी
*डेंग्यूचा मच्छर साचलेल्या पाण्यात होतात.
*घरात आणि आजुबाजूच्या परिसरात पाणी साचू देऊ नका.
*घरात फरशी पुसणाऱ्या पाण्यात केरोसिन किंवा फिनायल टाकून पुसा.
*जेव्हा घरातून निघाल, तेव्हा पुर्ण बाह्यांचे कपडे घाला,

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular