Tuesday, June 28, 2022
Homeभंडाराघरफोडी करणाऱ्या तीन चोरांना मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातून अटक

घरफोडी करणाऱ्या तीन चोरांना मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातून अटक

तुमसर :
घरफोडी करणाऱ्या तीन चोरांना मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातून सिहोरा पोलिसांनी अटक केली आहे. (राहुल पालेवार वय 22 वर्ष), (फैयाज खान वय, 20 वर्ष), (रोहित बांते वय, 22 वर्ष) सर्व राहणार जिल्हा बालाघाट, मध्यप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव आहे. या ताघांनी 7 जुलैला सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीत घर फोडून 3 लाखाची चोरी केली होती. अटक केल्यानंतर त्याच्याकडून चोरीला गेलेले दागीने व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.


तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिहोरा गावातील योगिराज बोकडे हे बाहेरगावी गेले असताना 7 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्य कडे घरफोडी झाली. चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख 1 लाख असा 3 लाख रुपयांचा ऐवज लंपाक केला असल्याची माहिती समोर आली आहे. चोरीची तक्रार मिळताच सिहोरा पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस आणि श्वान पथक यांनी चोरीच्या ठिकाणी जाऊन तपास केला. चोरीची पद्धत लक्षात घेता हे काम सराईत गुन्हेगारांचे आहे हे लक्षात आले. त्यामुळे या चोरट्यांना लवकरात लवकर गजाआड करा, असे आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिले
सायबरची मदत घेत एकाला केली अटक
सिहोरा पोलिसांचा तपास सुरू असताना सायबर पोलिसांच्या हातात काही तांत्रिक माहिती लागली. त्यांनी दिलेल्या व स्थानिक गुन्हे शाखेद्वारे मिळालेल्या गुप्त माहितीच्या मदतीने संशयित राहुल पालेवार याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली असता, त्याने इतर दोन मित्राच्या सहकार्याने चोरी केल्याचे, कबूल केले आहे. त्या तिन्ही व्यक्तींना अटक करत त्यांच्याकडून चोरीला गेलेले 19.12 ग्राम सोन्याचे दागिने व रोख 64 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे.
यांच्या अटकेमुळे चोरीचे व घरफोडीचे आणखी गुन्हे पुढे येण्याची शक्यता
या तिन्ही तरुणांनी लवकर श्रीमंत होण्याच्या हाव्यसपोटी चोरी, घरफोडीचे काम सुरू केले. बालाघाट हे महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने, भंडारा जिल्ह्यात घरफोडी करून हे आरोपी बालाघाटला परत जावून स्वतःला पोलिसांपासून दूर ठेवत होते. मात्र, यावेळी ते पकडले गेले. या अगोदर त्यांच्यावर बालाघाटमध्येही चोरीचे बरेच गुन्हे आहेत. तसेच, भंडारा जिल्ह्यातील किती चोरी आणि घरफोडीमध्ये यांचा सहभाग आहे, याचाही तपास पोलीस करीत आहेत. यांच्या अटकेमुळे चोरीचे व घरफोडीचे बरेच गुन्हे पुढे येतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular