Saturday, June 25, 2022
Homeभंडाराग्रीनफ्रेंड्स तर्फे जागतिक पृथ्वी दिन विविध उपक्रमांनी साजरा

ग्रीनफ्रेंड्स तर्फे जागतिक पृथ्वी दिन विविध उपक्रमांनी साजरा

पृथ्वीवरील जल-जंगल-जमीन-जंगलप्राणी वाचविण्याचे सर्वांना आवाहन

पृथ्वी चित्र व पृथ्वी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

लाखनी:-

येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे ‘जागतिक पृथ्वी दिन’ अर्थात ‘वसुंधरा दिन’ विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. या उपक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा, नेफडो जिल्हा शाखा भंडारा तसेच ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन( AKIF) जिल्हा भंडारा चे सहकार्य लाभले.


यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे संघटक प्रा.अशोक गायधने यांनी जागतिक पृथ्वी दिन अर्थात वसुंधरा दिन जगात का साजरा केला जातो त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सर्वाना समजावून दिली.पृथ्वी या ग्रहावरच सध्या जीवनचक्र आढळत असून हे जीवनचक्र अबाधितपणे सतत सुरू ठेवायचे असेल तर
संयुक्त राष्ट्रसंघाने ” Restore The Earth” ” रिस्टोअर द अर्थ” या संकल्पनेचे यावर्षी ब्रीदवाक्य ठेवले त्याचा अर्थ त्यांनी सर्वाना समजावून दिला. पृथ्वीवरील जल,जंगल,जमीन तसेच जंगलप्राणी टिकवून ठेवण्याची नितांत आवश्यकता आज निर्माण झाली आहे व त्याकरिता आजच्या कोरोना महामारीच्या काळात सजीव सृष्टीला टिकवण्यासाठी व शाश्वत विकासाकरिता सर्वांनी वृक्षारोपण करणे व अवैध शिकार ,प्रदूषण ,जंगलतोड, जागतिक तापमानवाढ थांबविण्यासाठी भरघोस प्रयत्न केले पाहिजे आणी 200 वर्षापूर्वीची “हिरवीगार पृथ्वी” पुन्हा स्थापित करू या असे त्यांनी प्रतिपादन केले.
यानिमित्ताने “पृथ्वी चित्र स्पर्धा”चे आयोजन यावेळी करण्यात आले. यावेळी स्पर्धकांनी “पृथ्वी वाचवा – Save the Earth- सेव्ह द अर्थ” या संकल्पनेवर सुंदर चित्रे संदेशासहित काढुन आणले.’जल- जंगल-जमीन-जंगलप्राणी वाचवा-पृथ्वी वाचवा’ असा संदेश त्यावर लिहिला व शिवाय त्याबद्दल स्वयंप्रेरीत उदघोष सुद्धा केला.
या स्पर्धेत मिडलस्कुल गटात अर्णव गायधने ला प्रथम क्रमांक,मनस्वी गभने ला द्वितीय तर हायस्कुल गटात छविल रामटेके ला प्रथम,तर प्रज्वल भांडारकर ला द्वितीय क्रमांक तर ज्युनिअर गटात आशिष खेडकर ला ला प्रथम तर अथर्व गायधने ला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.ओम आगलावे व आरु आगलावे यांना प्रोत्साहनपर क्रमांक देण्यात आला.
पृथ्वी प्रश्नमंजुषा स्पर्धेत पूजा रोडे व अथर्व गायधने ला प्रथम क्रमांक ,द्वितीय क्रमांक योगिता रोडे व अर्णव गायधनेला तर तृतीय क्रमांक छविल रामटेके,प्रज्वल भांडारकर यांना तर प्रोत्साहनपर क्रमांक मनस्वी गभने,ओम आगलावे, आरु आगलावे यांना देण्यात आला. वरील दोन्ही स्पर्धेचे परीक्षण प्रा. अर्चना गायधने यांनी केले.
या उपक्रमाच्या आयोजनाकरिता ग्रीनफ्रेंड्स, अभाअंनिसचे पदाधिकारी प्रा. अशोक गायधने, अशोक वैद्य, दिनकर कालेजवार ,पंकज भिवगडे,योगेश वंजारी तसेच नेफडो व अकिफ (Akif) भंडारा यांनी सहकार्य केले.

Previous article24/04/2021
Next article25/04/2021
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular