वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांची ताबडतोब कारवाही
भंडारा :
लठ्ठपणाचा आधार घेत चालता येत नसल्याचे कारण पुढे करीत चारचाकी वाहनात आधी लिफ्ट मागून नंतर चालकाला चहा आणि बिस्कीट याच्या माध्यमातून गुंगीचे औषध देत वाहनाची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळी ला भंडारा जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. तुमसर पोलिस ठाणे अंतर्गत घडलेल्या एका गुन्ह्यातील वाहनासह अन्य तीन गुन्ह्यातील वाहने तुमसर पोलिस व गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात घेतले आहे. आंधळगाव येथील कैलास तांडेकर 9 नोव्हेंबर रोजी एम एच 36 झेड 6016 क्रमांकाच्या आर्टिका कारने तुमसर येथून साकोली कडे जात असताना तुमसर बसस्थानकावर भास्कर नंदेश्वर याने लिफ्ट मागितली. तांडेकर हे एकटेच असल्याने व त्याच दिशेने जाणार असल्याने त्यांनी मदत करण्याच्या हेतूने नंदेश्वर याला गाडीत घेतले. दरम्यान वाटेत नंदेश्वर याने तांडेकर याला चहा आणि बिस्कीट च्या माध्यमातून गुंगीचे औषध दिले.

त्यामुळे तांडेकर बोहोष झाले. हे होताच त्यांना भर रस्त्यात झोपवून ठेवीत नंदेश्वर अर्टिका कर घेऊन पसार झाला होता. याची तक्रार तुमसर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तुमसर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचा तपास सुरू केला. सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषणाची आधारे लागलेल्या सुगव्याच्या मागावर पोलिसांचे. पथक खैरगड व दुर्ग साठी रवाना करण्यात आले. दरम्यान सिव्हील लाईन दुर्ग भागात पुष्पेंद्र सिंह व सतबिर सिंग हे दोघे तुमसर येथून चोरी करून आणलेली कार विकण्यासाठी येत असल्याची माहिती गुप्तहेरांच्या मदतीने पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचला गेला. त्या ठिकाणी आलेल्या अर्टिका वाहनाला थांबवून पोलिसांनी चौकशी केली असता व गाडीच्या तपासणीत गाडी चोरीची असल्याचे उघड झाले. सोबतच भास्कर नंदेश्वर याच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे आरोपींनी मान्य केले. यावेळी त्यांच्याकडून अर्टिका गाडी सह 5 मोबाईल व 127 झोपेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या.
विशेष म्हणजे या निमित्ताने आणखी तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील गुन्हे उघड झाले असून तशी कबुली आरोपींनी दिली. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील रामनगर आणि मध्य प्रदेशातील मांडला जिल्ह्यातील नैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी 1 महिंद्रा बोलेरो पीक अप वाहन चोरल्याचे आरोपींनी मान्य केले. तिसरा आरोपी भास्कर नंदेश्वर यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक नितीन राजकुमार, भूषण पवार, विवेक राऊत, हवालदार नितिन महाजन, नंदकिशोर मारबते, स्नेहल गजभिये, अमोल खराबे, तुळशीदास मोहरकर यांनी केली.