पवनी :
शहर सौदर्यींकरणाच्या कामादरम्यान येथील ऐतिहासिक Antique संरक्षण पाळीवर खोदकाम करण्यात आले. यावेळी पुरातन लोखंडी चाक आढळून आले. कंत्राटदाराने याबाबत कुणालाही न सां गता रातोरात सदर चाक इतरत्र हलविले. परंतु नागरिकांना याचा सुगावा लागताच त्यांनी या गोष्टीचा भांडाफोड करीत पुरात्वत विभागाकडे सदर चाक जमा करण्याची मागणी लावून धरली आहे.

सम्राट अशो क पूर्वका लीन जनपद असलेल्या पवनी नगराच्या सभोवताल संरक्षणासाठी दगड, माती व विटांची भक्कम तटबंदी बांधलेली आहे. सध्या पवनी शहरा त विविध विकासकामांसह सौंदसौं र्यीकरणाची कामे जोरात सुरू आहेत. दोन दिवसांपुर्वी याच खोदकामात बारा आरे असलेले हे लोखंडी चाक सापडले. हे चाक कंत्राटदाराने कुठेही वाच्यता न करता आपल्या चुऱ्हाड येथील कँपवर रा तोरात हलविले. परंतु दुसऱ्या दिवशी याची खबर लागताच परिसरातील नागरिक ही पुरातन वस्तू पाहण्यासाठी चुऱ्हाड गावाकडे वळले. चाकाला अशोकचक्र, रथाचे चाक तर कुणी याला रोड रो लर म्हणून आपले मत व्यक्त केले. परंतु प्रत्यक्षात गुगलवर या लोखंडी चाकाची माहिती शोधली असता हे चाक आतून व बाहेरून प्रत्येकी सहा आरे असे एकूण बारा आऱ्याचे पुरातन लोखंडी चाक असून हे संभवतः अठराव्या शतकातील माल वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचे किंवा तोफ वाहून नेणाऱ्या गाडीचे ब्रिटिशांच्या काळातील चाक असावे, अशी दाट शक्यता आहे.
पवनी शहर हे पुरातन मोठ्या लोकसंख्येचे नगर असल्यामुळे या नगरीवर पेंढाऱ्यां नी लुटीसाठी बऱ्याचदा आक्रमणे केली. तसेच ब्रिटीशांनी आक्रमण करून पवनी काबीज केली. त्यामुळे खोदकामात सा पडलेले हे बारा आऱ्याचे पुरातन लोखंडी चाक ब्रिटीशांनी युद्धात तोफ वा हून नेणाऱ्या गाडीचे चाक असावे, असे मत पुरातत्व संशोधन व संरक्षण समितीचे अध्यक्ष अॅड. महेंद्र गोस्वामी यांनी व्यक्त केले. या संबंधाने भारतीय पुरातत्त्व खात्याने तातडीने घटनास्थळी भेट देवून खोदकामाच्या जागेची पाहणी करावी व खोदकामात सापडलेल्या लोखंडी चाकाची तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आह