Tuesday, June 28, 2022
Homeभंडाराऑनलाइन शिक्षणा मुळे शिक्षण व्यवस्थेचे असित्व धोकाक्यात : प्रवीण उदापुरे

ऑनलाइन शिक्षणा मुळे शिक्षण व्यवस्थेचे असित्व धोकाक्यात : प्रवीण उदापुरे

भंडारा :
राज्यातील सर्व शाळा विद्यार्थ्यां शिवाय सुरू झाल्या. शिक्षकांनी शाळेत हजेरी लावून विद्यार्थ्यांचे घरापर्यंत जायचे त्यांना ऑफलाइन, ऑनलाइन जे शक्य असेल ते शिक्षण द्यायचे असे शासनाने धोरण ठरविले. जिल्ह्याती पालकांची आर्थिक परिस्थिती व साधन सुविधा च्या अभावा मुळे ऑनलाइन पर्यायाचा विचार केल्यास शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण निरुपयोगी असल्याचे जाणवत मत उदापुरे यांनी व्यक्त केले .


शहरातील मागास भागात राहणारे नागरिक आणि राज्यातील ग्रामीण भागात राहणारे नागरिक त्यांच्या पाल्यांना स्मार्टफोन विकत घेण्यास सक्षम नाहीत. ते स्वतःचे स्मार्टफोन पाल्यांना शिक्षणासाठी पूर्णवेळ देऊ शकत नाही. स्मार्टफोन आहे; पण इंटरनेट सुविधा मिळत नाही.इंटरनेट आहे पण कव्हरेज नाही. कव्हरेज आहे पण स्पीड नाही अशी अवस्था आहे . शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे घरापर्यंत जाऊन अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण कसे द्यावे, या प्रश्नावर शिक्षण विभागाने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. ऑफलाइन पर्यायाचा विचार केला तर ३० मिनिटांची तासिका घेऊन पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांना एका विषयावर मार्गदर्शन करणारे शिक्षक घरोघरी जाऊन एका-एका विद्यार्थ्यांना किती विषय किती वेळ शिकवतील , असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शैक्षणिक भवितव्या साठी शाळा सुरू करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे पालकांना वाटत आहे. मागील सत्रात पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेले विद्यार्थी ज्यांनी शाळेची वर्ग खोली देखील पाहिली नाही. या वर्षी शैक्षणिक सत्रातील अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. सलग दोन वर्षे जे विद्यार्थी शाळाबाह्य राहतील त्यांची शैक्षणिक नुकसान भरपाई कशी करणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये यासाठी उपक्रम राबविणाऱ्या शिक्षण विभाग कोरोना संकटामुळे हतबल झाले आहे . त्या सर्वांना पुन्हा नियमित शाळेत बोलावून शिक्षणाचा त्यांचा हक्क प्रदान करण्यासाठी प्रभावी योजना आखणे गरजेचे आहे असे मत सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी व्यक्त केले .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular