तुमसर :
आमदार डॉ परिणय फुके यांनी आज माजी खासदार मा.श्री शिशुपालजी पटले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्याठिकाणी आलेल्या मोहाडी व तुमसर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्या सोबत विविध समस्यांवर चर्चा केली.

यावेळी आमदार डॉ फुके यांनी सर्वांच्या समस्या एकुण घेतल्या व समस्येशी संबधीत विभागाचे अधिकारी यांना वेळीच संपर्क करून सोडवण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती नगर परिषद च्या निवडणुका होणार असुन त्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून समाधान करण्याचे आवाहन त्यांना यावेळेस केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शिवराम गिर्हेपुंजे, माजी खासदार श्री शिशुपालजी पटले, नगराध्यक्ष तुमसर प्रदीप पडोळे, मुन्ना फुंडे, सौ गीता कोंढेवार, दिनेश निमकर, सुनील लांजेवार, गजानन निनावे, श्री शालीक शहारे, श्रीकांत जोशी, हनुमंत मेंढे, डॉ चंद्रशेखर भोयर, बाबू ठवकर, भगवानजी चांदेवार, देवसिंग सव्वालाखे, सुरेश ठवकर, संतोष वहिले, ज्ञानेश्वर बिरणवारे, सौ उर्मिलाताई दमाहे, सौ अंजनाताई सरादे, राजेंद्र पिकलंमुंडे, विजय पारधी, सचिन बोपचे, सुनील पारधी व इतर मान्यवर उपस्थित होते.