Sunday, May 29, 2022
Homeभंडाराआदर्श युवा मंच तर्फे बैल पोळा निमित्त विविध उपक्रम

आदर्श युवा मंच तर्फे बैल पोळा निमित्त विविध उपक्रम

भंडारा-
वर्षभर शेतामध्ये शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून मेहनत करणाऱ्या बैलराजा व शेतकरी बांधवांचा मोठा सण म्हणजे बैलपोला या सनानिमित्त जिल्हा परिषद गणेशपुर येथे शेतकरी बंधून सोबत मोठ्या उत्साहाने जनसेवक पवन भाऊ मस्के आदर्श युवा मंच अध्यक्ष संस्थापक यांनी बैलपोळा हा साजरा केला. व त्यांना भेट म्हणून अनेक वेगवेगळ्या वस्तू देखील भेट स्वरूपात दिल्या तसेच आधुनिक जगामध्ये बैल पोळ्याचा निमित्याने बैलाचां असण्याचा हा महत्त्व देखील पटवून दिला क्षेत्रांमध्ये असलेले गावे गणेशपुर पिंडकेपार बेला कोरभी दवडीपार अशा प्रत्येक गावांमध्ये जाऊन मोठ्यांचा आणि आई बहिनींचा लहान बाळांचा सर्वांसोबत उत्साहाने हा सण त्याच्या घरी जाऊन साजरा केला व तसेच मोठ्यांचा वयोवृद्धकांच्या आशीर्वाद देखील घेतला यावेळी पूर्ण क्षेत्रात एक आनंदीचा वातावरण होता.याप्रसंगी जि. प.गणेशपूर क्षेत्रातील विविध गावातील शेतकरी वर्ग, प्रकल्पग्रस्त,विद्यार्थी, व गावातील नागरिकाच्या समस्या जाणून घेऊन त्या लवकरात मार्गी लावू असेही अश्वासन पवन मस्के यांनी सांगितले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular