Saturday, June 25, 2022
Homeभंडाराआंबागड जंगलात दारुच्या हातभट्टीवर पोलीसांची धाड!

आंबागड जंगलात दारुच्या हातभट्टीवर पोलीसांची धाड!

आंधळगाव पोलीसांची कारवाई ; ७५ हजाराचे मुद्देमाल जप्त
तुमसर :
कोरोना काळ अन् अवैध धंद्याचे फोफावलेले तंत्रांने सध्या तुमसर-मोहाडी तालुक्याला ग्रासले आहे. त्यातुनच आंधळगाव पोलीसांनी धड टाकून आंबागड जंगल शिवारात मोहफुलाच्या अवैध दारू-हातभट्टीवरुन ७५ हजाराचे मुद्देमाल जप्त केले आहे. पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर धाड़ बुधवारच्या दुपारी टाकण्यात आली. आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांच्या नेतृत्वात टीमने त्या अवैध हातधट्टीच्या परिसराला गाठले. सदर करावाईत पोलीसांनी ईश्वर(सोनु) नारबा बडवाईक(३६,राह. पिपरा) व कैलाश महादेव साठवणे(राह. तुमसर) या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान आरोपींकडून घटनास्थळावरुन ३० लिटर दारू, १ हजार १२५ किलो मोहफुलाचा सळवा व भट्टीकरीता लागणारे इतर साहित्य पोलीसांनी जप्त केले आहेत.


तुमसर-मोहाडी दरम्यान आंबागडचे जंगल सध्या अवैध धंदे राबविणा-यांकरीता सुरक्षित ठिकाण बनले आहे. पावसाळ्यात जंगल भागातील झाडांची हिरवी दाटी व त्याच्या आडोश्याला चालणा-या दारुच्या अवैध हातभट्टीबाबत आंधळगाव पोलीसांना गुप्त माहिती मिळाली. माहितीचा आधार घेत पोलीसांनी घटनास्थळ गाठले. त्यात पोलीसांना आरोपी सोनू व कैलाश हे हातभट्टीच्या तंत्राने मोहफुलाच्या देशी तंत्रातून दारु गाळण्याचे काम करतांना आढळून आले. पोलीसांनी दारुच्या त्या अवैध हातभट्टीला उद्धवस्त करुन आरोपींसह घटनास्थळावरील सर्व मुद्देमाल ताब्यात घेतले. त्यात पोलीसांना रबरी ट्युबमध्ये हातभट्टीची अंदाज़े ३ हजार किमतीची दारू, २५ किलो प्रती याप्रमाणे ४५ प्लिस्टीक पिशव्यामध्ये ६७ हजार ५०० रुपये किमतीचा मोहफुलाचा सडवा(रसायन), २० किलो प्रमाणे १२०० रुपये किमतीचा भट्टीवर मांडलेला गरम सडवा, व भंट्टीला लागणारे साहित्य व लाकडे आणि इतर याप्रमाणे एकूण ७५ हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
अवैधरित्या विनापरवाना हातभट्टीतुन मोहफुलाची दारु गाळणा-या आरोपींविरुद्ध अांधळगाव पोलीसांनी अपराध क्रमांक १३४/२१ नुसार कलम ६४ व महा.दा.कायद्याच्या कलम ८३ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर कारवाई परिसरातील अवैध दारुच्या हातभट्ट्या व विक्रित केंद्राचे समुच्च उच्चाटन करण्याच्या मोहिमेतून करण्यात आल्याचे आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांनी सांगितले आहे. त्या मोहिमेचे मार्गदर्शक पोलीस अधिक्षक वसंत जाधव असुन आंधळगाव पोलीस स्टेशनचे पो. ना. मंगेश पेंदाम, पो. शि.नवनाथ सिंधमे व अभिलास ढोंबरे यांनी सदर कारवाईत सहकार्य केले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular