Saturday, May 28, 2022
Homeनागपुरस्वतंत्रता दिवस निमित्त नवोदय जनोत्थान संघटन वृक्ष वितरण करून शुभारंभ"

स्वतंत्रता दिवस निमित्त नवोदय जनोत्थान संघटन वृक्ष वितरण करून शुभारंभ”


_____________________
आज दिनांक १५ आॅगस्ट स्वतंत्र दिवस विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला संघटन अध्यक्ष प्रवीण गोडे यांनी माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. महात्मा गांधी, छत्रपति शिवाजी महाराज, माहात्मा जोतीबा फुले, भारत माता, भगतसिंह, लालबहादुर शास्त्री, यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करण्यात आले, तिरंगा झेंड्याला मान वंदना सलामी देऊन राष्ट्रीय गीत घेण्यात आले, गावातील नागरीकांना तसेच पत्रकारांना वृक्ष वितरण करण्यात आले व बुंदी वितरण केले. भारत देशाला स्वतंत्रता सेनानी विरांना आठवणीला उजळीनी केली संघटन सचिव प्रदीप बावने, सह सचिव अभिजित चांदुरकर, कोषाध्यक्ष सतीश उके, ज्ञानेश्वर दारोडे, सोनु मसराम, महेश शेंन्डे, आनंद भाऊ बेलसरे,यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमा चे सुत्रसंचालन अखिलेश मेश्राम व आभार संघटन उपाध्यक्ष संजय रंगा री यांनी केले. कार्यक्रम दिनी नविन सभासदांनी प्रवेश केले दिनेश नारनवरे, चंद्रशेखर वंजारी, चंदु पानतावने, दिपनकर गजभिये,विक्रांत माहोरकर यांचे प्रवेश होऊन कार्यक्रमात उपस्थिति मनिष शंभरकर, प्रकाश कुर्वे, सोनु खोब्रागडे, प्रवीण माने, अरूण थापा, पंकज राम टेके, आकाश पंडीतकर, मुकेश गंगराज, योगेश मोहोड,शरद यादव आदी नागरिक उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular