1) सर्व दुकान मालकाची केली आरटीपीसीआर चाचणी ::
—————————————- नरखेड तालुका प्रतिनिधी ता. 13
स्थनिक मोवाड शहरात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना संसर्गची तिसरी लाट आल्यामुळे ग्रामीण भागात तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव होऊ नये दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोनाचे पेशंट वाढत आहे ग्रामीण भागात सुद्धा या तिसऱ्या लाटेचा परिणाम होऊ नये म्हूणन शासनाच्या नियमानुसार शाळा सुद्धा पंधरा फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आल्या. दि.12 रोजी मोवाड बुधवार आठवडी बाजारात कोरोना संसर्ग महाराष्ट्रात वाढत असल्यामुळे नागरिकांनी कठोर नियामाचे पालन करावे, दुकान मालकाची आरटीपीसीआर चाचणी, मास्क लावणे प्रतिबंधक असणे,जे दुकानादार बाजारात नियामाचे उल्लंघन करत असेल त्याच्या कडुन नगरपरिषदेने दंड वसूल करण्यात आला सर्व दुकान मालकाची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यात आली त्याचें नमुने मेयो प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्यामुळे शासनाकडुन सर्व तो परी उपाययोजना केल्या जातं आहे मास्क न लावणाऱ्या व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर, दुकान मालका वर नगरपरिषद प्रशासना कडुन कठोर कार्यवाही करण्यात आली यावेळी नगरपरिषद प्रशासन विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, अशा तीनही विभाग प्रशासननी मोवाड आठवडी बाजारात कोरोना संसर्ग संबधीत लॉंगमार्च धडक मोहीम राबविण्यात आली. यासाठी मोवाडवासी नागरिकांनी, दुकान मालकांनी प्रशासनाला सहकार्य करावें असे आवाहन मुख्यधिकारी पल्लवी राऊत, डाँ, उमरेगेकर, मोवाड पोलीस इंजार्ज मसराम यांनी केले आहे.