Tuesday, June 6, 2023
Homeनागपुरमहात्मा गांधी विद्यालयात शिक्षक दिन साजरा,,

महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक दिन साजरा,,


,,विविध स्पर्धेचे आयोजन,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापीका तथा प्राचार्या स्मिता चिताडे होत्या,प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपमुख्याध्यापीका शोभा घोडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,पर्यवेक्षक अनिल काकडे होते.


सर्वप्रथम शिक्षण तज्ज्ञ माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली,
शिक्षक दिन चे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते,या दोन्ही स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले,
वर्ग 5 ते 8 गटातील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आलिया पठाण,द्वितीय प्रियंका आगलावे,तृतीय क्रमांक आकांक्षा गिरी हिने पटकावला,प्रोत्साहन पुरस्कार गायत्री निमसटकर ला मिळाला,याच गटातील निबंध स्पर्धेत सोनाक्षी चव्हाण विजेती ठरली,
वर्ग 9 ते 12 गटातील वक्तृत्व स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक आंचल वरारकर,द्वितीय प्राजक्ता उरकुडे तृतीय क्रमांक अंजली केळझरकर हिने मिळविला,
याच गटातील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक विशाखा लिपटे,द्वितीय पुर्वा सोनपितरे,तृतीय क्रमांक साक्षी मालेकर ने तर प्रोत्साहन पुरस्कार श्रेया जाधव हिने मिळविला,
परिक्षक म्हणून प्रतिभा गेडाम,तुकाराम धुर्वे,प्रा,सुधीर थिपे,हनुमान मस्की,प्रा,प्रदीप परसुटकर, सतीश ठाकरे,विश्वनाथ धोटे, भारती घोंगे यांनी कार्य केले,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा, विजय आकनूरवार यांनी केले,संचालन प्रा,बाळू उमरे यांनी केले ,तर आभार वामन टेकाम यांनी मानले,
यावेळी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकातर्फे तयार केलेल्या कुंडी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले,
कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते,

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular