पिपरा प्रतिनिधी
आशिष सोनटक्के

बेला – श्री, संत बालयोगी रामचंद्रमहाराजांच्या वास्तवाने आणि पावलाने पावन झालेली बेला नागरीत श्री संत कोलबा स्वामीच्या पावन भूमीत झालेल्या बेला नागरी आषाढी एकादश उत्सव व गुरुपौर्णिमा मोठ्या आनंदाने भक्तिभावाने साजरा करण्यात आली विश्व मिशनचे मुख्य, आचार्य परमपूज्य सद्गुरू समर्थ राधेशाम महाराज मठाधीश यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसीय भजन-कीर्तन पूजन यांचे आयोजन करण्यात आले होते 24/7/21 शनिवारी संध्याकाळी जागृती कीर्तन सुरू झाले त्यामध्ये ते म्हणाले की काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार, हे जोपर्यंत मनुष्य मनातून काढत नाही तोपर्यंत हा नाऱ्या चा नारायण म्हणजे महामानव होऊ शकत नाही कोलबा स्वामी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे शिष्य होते त्यांनी वयाच्या 105 वर्षांनी संजीवनी महा समाधी विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवडा येथे घेतली कोरोनावर त्यांनी जणजागृतीही केली कोलबास्वामीच्या सत्संग सदा वर्तन ,सदा विचार या तीन तत्त्वानुसार मास खाऊ नयेत दारू पिऊ नये कोणत्याही वाईट व्यसन करू व्यभिचार करु नये सदाचाराने बाळगावा व सर्व धर्मावर प्रेम करावे हे रविवारी गोपाल काला झाला नंतर
कोलबा स्वामी महाराजांची पादुका असलेली पालखी गावातील भक्तजनाच्या दर्शना साठी गावातील मुख्य रस्त्याने प्रदक्षिणा मारण्यात आली सर्वानी रोगराई पासून दूर कर कोरोना महामारी दूर कर अशी मनोकामना करण्यात आली पालखी कोलबा स्वामी मंदिरा समोर आल्यावर गुरु पूजा करून दहीहंडी फोडण्यात आली श्री संत रमादेवी कार्यक्रम आवर्जून उपस्थित होत्या कोरोणाचे नियमाचे पालन करून महोत्सव पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कुमार शुक्रकांत रमेश मेंढुले सौ, शालुबाई मेंढुले माजी सभापती
सौ लताबाई देशमुख ,श्रीमती व वेणूबाई कुंभारे, सुशील धार्मिक, कृष्णा मेंढुले कुमारी मधु शेळके ,लक्ष्मण खोडके गुरुजी, विलास उजवणे, यांनी सहकार्य केले.