विदर्भ कल्याण/ सिर्सी
खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत रुग्णवाहिका सेवा प्राथमिक आरोग्य केंद्र सिर्सी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरजू आणि आजारी लोकांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णवाहिका वाहणे वाटप करण्यात आली.

श्री.मिलिंद इ.सुटे जि.प.सदस्य यांनी शासनाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली होती. आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सिर्सी येथे एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. रुग्णवाहिकेचे पूजन करून लोकांच्या सेवेत सुपूर्द करण्यात आली. रुग्णवाहिकेची पूजा श्री. मिलिंद इ.सुटे जि. प.सदस्य नागपूर, सिर्सी सर्कल प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमात श्री. भोजराजजी दांदडे उपसरपंच सिर्सी, श्रीमती वंदना बूटे , श्रीमती माधुरी वाकडे ग्रा. प . सदस्या सिर्सी, तसेच डॉ. सुरेश माने वैद्यकीय अधिकारी व डॉ. आशिष सोनुने वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र सिर्सी, तसेच कर्मचारी वर्ग व आशा स्वयंसेविका व गावातील नागरिक उपस्थित होते.