Saturday, June 25, 2022
Homeनागपुरपंचायत समिती परिसरात उमेद विक्री केंद्र

पंचायत समिती परिसरात उमेद विक्री केंद्र

भिवापूर (दिनांक-२१/०६/२०२१):
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती, भिवापूर अंतर्गत जय दुर्गा महिला स्वयंसहाय्यता समूह, किन्हाळा यांचे तिखट, हळद पावडर, मसाले, पापड, कुरडया, वड्या, सेंद्रिय जय श्रीराम तांदूळ, डाळ इत्यादी पदार्थांचे उमेद विक्री स्टॉल पंचायत समिती परिसरात लावण्यात आले. स्टॉलचे उद्घाटन सभापती श्रीमती ममताताई शेंडे यांचे हस्ते गट विकास अधिकारी श्रीमती माणिक हिमाणे, उपसभापती श्री. कृष्णाजी घोडेस्वार, पंचायत समिती सदस्य श्री. राहुल मेश्राम यांचे उपस्थितीत पार पडले.

यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक रविंद्र शेंडे, विस्तार अधिकारी कल्पना लोखंडे, तालुका व्यवस्थापक कु. आरती तिमांडे, प्रभाग समन्वयक चिरंजित बुरांडे, कु.दुर्गा नुनावत व समूहाचे महिला उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular