कन्हान : सलग दोन वर्षयाच्या लॉकडाऊन मध्ये सलून व्यवसाय कात्रीत सापडला आहे. राज्यात नाभिक समाजाची लोकसंख्या ४५ लाख आहे. नाभिक समाज शहर आणि लहान-मोठ्या गावखेड्यांमध्ये विखुरलेला आहे. त्यातील ८० ते ९० टक्के समाजबांधव पारंपरिक केशकर्तनाचा व्यवसाय करतात. तर सरकारी नोकरीच्या क्षेत्रात यांचा टक्का ०.२ इतका आहे.

तसेच राज्यभरातील सुमारे दोन लाख सलून दुकाने आणि त्या दुकानातील लक्षावधी कारागीर शासनाच्या विविध योजनांची तथा मदतीची अपेक्षा करीत असून कोणतीही योजना पुर्णतः मिळत नाही आर्थिक विकास महामंडळातून कर्जपुरवठा याशिवाय, वयाच्या ५५व्या वर्षांनंतर पेन्शन, गर्भवती महिलेच्या प्रसूतीचा खर्च, विद्यार्थ्यांना अल्प व्याजदरात शैक्षणिक कर्ज, नाभिक व्यावसायिकाला सलूनसाठी जागा अथवा गाळा उपलब्ध करून देण्याचे कार्य बोर्डद्वारे नाभिक समाजासाठी असणार्या विविध योजनना सुरु करता येतील, महाराष्ट्र शासनाने केशशिंपी महामंडळाची स्थापना जर झाली तर गरजु नाभिक बांधवाना मोठा आधार मिळेल परंतु महाविकास आघाडी सरकारने या बोर्डा कडे अद्याप दखल घेतल्याचे समजून आलं नाही
शासनाने केशशिल्पी बोर्डा लवकरच जाहीर केलं तर कोरोना व लॉकडाऊन च्या या दुर्दैवी काळात शोषित पीडित समाजाच संजीवनी रूप धारण होईल अस नाभिक एकता मंचाचे संस्थापक अध्यक्ष धनराज वलोकर यांनी सांगितले.