Tuesday, June 28, 2022
Homeनागपुरनगभिद तालुक्यातील मोहाडी मो कांपा रोडवर मोहाडी पासुन दोन किमी अंतरावर महामार्गावर...

नगभिद तालुक्यातील मोहाडी मो कांपा रोडवर मोहाडी पासुन दोन किमी अंतरावर महामार्गावर झालेल्या अपघातात मोहाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.


प्राप्त माहतीनुसार मोहाडी येथील राजकुमार नामदेव दोडके हा युवक कानपा येथून आपले काम आटपून आपल्या स्वतःच्या दुचाकी क्रमांक MH34B,W4553 ने गावी परत येत असताना समोरून नगभिढ कडून येणाऱ्या चार चाकी वाहन क्रमांक MH-31,DV1695 या गाडीने जबर धडक दुचाकीला दिल्याने जागीच दुचाकी स्वार राजकुमार दोडके वय अंदाजे 30 वर्ष याचा घटना स्थळी च मृत्यू झालाय तर धडक देणाऱ्या गाडीचे चालक घटनास्थळावरून पसार झाले.गावातील एका उमद्या आणी होतकरू मनमिळाऊ तरुणाच्या अकाली निधनामुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे पुढील तपास नगभि ड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांचे मार्गर्शनाखाली नगभि ड पोलिस करत आहेत.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular