ब्रम्हपुरी:-
ब्रम्हपुरी ,नागभीड तालुक्यातील पिंपळगाव,अर्हेर नवरगाव, नांदगाव ,नांहोरी कलेता,तोरगाव,मौशी आदी गावातील टॉवर ग्रस्त शेतकरी टॉवर लाईनचा मोबदला न मिळाल्याने उपविभागीय कार्यालयासमोर आजपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात आहे.

ब्रम्हपुरी ,नागभीड तालुक्यातील शेतशिवरातून रायपूर राजनांदगव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीची ७६५ के.व्ही. उच्च दाबाची विद्युत वहिनी
ब्रम्हपुरी तालुक्यातील लाळज,पिंपळगाव,अर्हेर नवरगाव, नांदगाव ,नांहोरी,कलेता,तोरगाव तर नागभीड तालुक्यातील मौशी,विलम,मोहाडी,बामणी,मांगली,तेलिमेडा.बलापूर येथे टॉवर उभारनीपूर्वी टॉवर ग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे ठरले होते मात्र टॉवर उभारून लाईन सुरू होऊन तीन वर्षे होऊन सुद्धा शेतकऱ्यांना मोबदला देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
ब्रम्हपुरी व नागभीड तालुक्यातून रायपूर राजनांदगव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीची ७६५ के.व्ही. उच्च दाबाची विद्युत वहिनी गेली असून टॉवर लाईन च्या परिसरात काम करणे शेतकऱ्यांना धोक्याचे असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतकाम करावे लागते .पण सदर कंपनीने निर्धारित केलेला मोबदला मागील तीन वर्षांपासून अद्यापही टॉवर लाईन ग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविलेला नाही.टॉवर लाईन ग्रस्त शेतकऱ्यांनी सदर बाबतीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना व राजकीय नेत्यांना निवेदनाद्वारे मदतीचा हात मागितले असता त्यांनी दिलेल्या निवेदनांना केराची टोपलीच दाखवली असल्याने सदर कंपनी शेतकर्यांना भूलथाप देत आहे .त्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांनी रायपूर राजनांदगव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनी विरोधात तात्काळ मोबदला देण्यात यावा करिता ब्रम्हपुरी येथील उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
मागील कित्तेक दिवसांपासून आम्ही जिल्हाडीकऱ्यांकडे व काही राजकीय नेत्यांकडे निवेदने दिलीत,कार्यालयात हेलपाटे घातले मात्र अद्याप आम्हाला मोबदला मिळालेला नाही.जोपर्यंत आम्हाला मोबदला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवणार.
:-हरिश्चंद्र ठेंगरे
(टॉवर लाईन ग्रस्त शेतकरी)