Saturday, May 28, 2022
Homeनागपुरघुग्घुस येथील अंजुमन रजाये मुस्तफा मुस्लिम अल्पसंख्यक बहुउद्देशीय संस्था तर्फे देवराव भोंगळे...

घुग्घुस येथील अंजुमन रजाये मुस्तफा मुस्लिम अल्पसंख्यक बहुउद्देशीय संस्था तर्फे देवराव भोंगळे व विवेक बोढे यांचा सत्कार

   मुस्लिम समाजाच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध- देवराव भोंगळे

घुग्घुस प्रतिनिधी

 घुग्घुस येथील अंजुमन रजाये मुस्तफा मुस्लिम अल्पसंख्यक बहुउद्देशीय संस्था तर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व नवनियुक्त भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर चंद्रपूरचे उपमहापौर राहुल पावडे, पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, उत्तर भारतीय मोर्चाचे संजय तिवारी, भाजपा नेते संजय भोंगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप  उपस्थित होते.
   भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी घुग्घुस शहरात अनेक विकासाचे व सामाजिक कार्य केले त्याअनुषंगाने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच नुकतीच भाजयुमोच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी विवेक बोढे यांची निवड करण्यात आली, ते नेहमी समाजासाठी धावून येतात त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. 
   याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले मुस्लिम समाज बांधवांच्या विकासासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहो. मुस्लिम इमामवाडा, इदगाह तथा कब्रस्थान येथील विकासकामे केली. कोरोना काळात समाजातील रुग्णांना, गरजवंतांना तात्काळ मदत केली. मुस्लिम समाजाचे प्रेम व आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहिला आहे. समाजासाठी धोरणात्मक विकास कामे करण्यावर आमचा भर राहणार आहे.
 संचालन नौशाद कुरेशी यांनी केले तर आभार प्रदर्शन नईम खान यांनी केले.
    यावेळी घुग्घुस येथील अंजुमन रजाये मुस्तफा मुस्लिम अल्पसंख्यक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष खलील अहमद, हाजी रियाजउद्दीन, उपाध्यक्ष शेख हसन मैनुद्दीन शेख, सचिव मुस्तकीन खान, रियाजूल हसन नेताजी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, उत्तर भारतीय आघाडीचे संजय तिवारी, मुस्लिम खान, सय्यद इद्रीस, वसीम खान, एकराम भाई, नौशाद सिद्दीकी,  रियाज अहमद, मोमीन शेख, इसरार अहमद, इरशाद कुरेशी, अब्दुल सलीम खान, मुनाज कुरेशी, मुस्तफा शेख, बाबू सिद्दीकी, साहेब सिद्दीकी, जफरउद्दीन बेग, इम्तियाज बेग इस्तेखार कुरेशी, माशुक सिद्दीकी व मोठया संख्येत मुस्लिम बांधव उपस्थित होते.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular