Saturday, June 25, 2022
Homeनागपुरके.टी. नगर नागपूर येथे १०० खाटांचे कोविड रुग्णालय

के.टी. नगर नागपूर येथे १०० खाटांचे कोविड रुग्णालय

डॉ परिणय फुके यांचा पुढाकार :
नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

नागपूर: श्री रमेश फुके (पाटील) चॅरिटेबल ट्रस्ट व नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्याने चालविल्या जाणाऱ्या के.टी. नगर रुग्णालय, नागपूर येथे मंगळवारी २७ ला १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले.


याप्रसंगी बोलतांना नितिन गडकरी म्हणाले की नागपूर येथे कोविड रुग्णांना अधिकाधिक सोयी उपलब्ध व्हाव्या म्हणून अनेक सामाजिक संस्था आपली सेवा देत आहेत. याचाच भाग म्हणून सामाजिक दृष्टिकोन ठेवत आ. फुके व त्यांच्या टीम ने हे एक चांगले कार्य हाती घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आमदार फुके यांची प्रशंसा केली. ते म्हणाले की सदैव परिणय फुके हे सामाजिक कार्यामध्ये आपली सेवा देत असतात. या सर्व सोयीने युक्त अशा कोविड सेंटर ची सेवा कोविड रुग्णांनी घ्यावी असे सांगून यामध्ये सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका संस्थेचे पदाधिकारी यांची प्रशंसा केली.
याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सुध्दा कोविड सेंटर बाबत माहिती दिली. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके यांनी या कोविड सेंटर चा फायदा नागपूरसह भंडारा गोंदिया जिल्ह्यातील रुग्णांना होणार असे यावेळी सांगून, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नितीनजी गडकरी यांच्याकडे केली असता पाठपुरावा करून जास्तीत जास्त सिलेंडर उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी उपमहापौर मनीषाताई धावडे, मनपा आयुक्त बी राधाकृष्णन, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, आरोग्य सभापती संजय महाजन, धरमपेठ झोन नागपूर सभापती सुनील हिरनवार, उप आयुक्त प्रकाश जी वऱ्हाडे, नगरसेवक मायाताई इवणाते, दर्षणाताई धवड, विक्रम ग्वालबंशी, अमर बागडे, भाजपा ओबीसी नागपूर अध्यक्ष रमेश चोपडे, च्यारिटेबल ट्रस्ट चे उपाध्यक्ष प्रवीण जैन, सहसचिव नितीन फुके, कोषाध्यक्ष तथा नगरसेविका डॉ. परिणीता फुके, डॉक्टर, परिचारिका उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular