Saturday, June 25, 2022
Homeनागपुरकुही शहराचा नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत वैदेही दिपक केने हिने सीबीएसई दहावीच्या...

कुही शहराचा नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत वैदेही दिपक केने हिने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९९.६० टक्के घेऊन महाराष्ट्रात दुसरं क्रमांक पटकावलं

कुहीच्या लेकीने अभिमानस्पद कामगिरी केल्याने कुही युवक काँग्रेस आणि युवासेना कुही यांच्या वतीने वैदेहीचे पुष्पगुचं देऊन पुढीलवाटचालीस शुभेच्छा देण्यात आले

कुही-केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थातचं सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा परीक्षेचा निकाल आताच जाहीर झालेल आहे.या सीबीएसई बोर्डाचा परीक्षेत पहिल्यांदाच कुही शहराचा नाव उंच शिखरावर पोहचलेलं आहे त्याचंबरोबर इतिहासमय कामगिरी सुद्धा प्रथमचं झालेली आहे.राणी इंदिराबाई भोसले कुही येथील प्राचार्य श्री दिपक केने सर व सौ ज्योसना दिपक केने यांची कन्या कु.वैदेही दिपक केने हीने सीबीएसईच्या इयत्ता दहावीचा परीक्षेत ९९.६० अशी उंच्च गुण संख्या घेऊन सुयश संपादन केले.आणि महाराष्ट्रातील बेस्ट पाच मध्ये द्वितीय क्रमांक वैदेहीने पटकावलेला आहे.

वैदेही ही महर्षी विद्या मंदिर बेला भंडारा येथे शिक्षण घेत होती.येथील अभ्यासवृत्तीत आणि विविध कला व्यासंगी आहे.या विद्या मंदिरात दहावीचे चार शेक्शन असून या ठिकाणी सर्वात गुणवत्ताप्राप्त वैदेही ठरली.पुढील शिक्षण इंजिनियर क्षेत्रात आणि नौदल क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा वैदही हिने आपल्या काव्यातुन व्यक्त केले आहे.विशेष पाहता वैदेहीने कोणतेही क्लासेस न लावता या परीक्षेत घवघवीत सुयश संपादन केले आहे.वैदेहीने महर्षी विद्या मंदिर या संस्थेचे नाव रोशीत केल्याने प्राचार्य श्रीमती ओवले मॅम आणि सर्व शिक्षक गण यांनी वैदेहीला शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस शुभ आशीर्वाद दिले.वैदहीच्या यशाबद्धल कुही,तालुक्यातचं नाही संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र कोतुक आणि अभिनंदन केले जात आहे.कुही शहराची लेक वैदेही हिने संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानस्पद कामगिरी केल्याने कुही युवक काँग्रेसचे नेते श्री कैलास चौधरी ,शिवसेनेना प्रणित युवासेना पंकज प्र झुरमुरे आकाश लेंडे, मयूर तळेकार, पीयुष देवतळे,प्रतीक ढबाले, कुणाल लेंडे,अनुप मेश्राम, आकाश गुरणुले, दिपक लेंडे,देवा मोटघरे,सौरभ पंचबुधे,विकास पडोळे,स्वप्नील माहुले,मनोज घारपिंडे या सर्वांनी एकत्रित होऊन वैदेहीचे सत्कार आणि पुष्पगुचं देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular