Wednesday, October 4, 2023
Homeनागपुरकुही तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागण

कुही तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागण


कुही/—-


*कुही तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे जे नुकसान झाले त्याचे त्वरीत पंचनामे करुन शेतकर्यांना नुकसाण भरपाई देण्यात यावी , ज्यांच्या घरांच नुकसान झाल त्यांना आर्थीक मदत देण्यात यावी व टेकेपार येथील दामोधर लेंडे यांचा भिंत कोसळुन मृत्यु झाला त्यांच्या परिवाराला शासनातर्फे आर्थीक मदत करण्यात यावी ,म्हणुन मा.अंबादे साहेब नायब तहसिलदार कुही यांना शिवसेना पक्षातर्फे निवेदन देण्यात आले . लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास तहसिल कार्यालय कुही सामोर तिव्र आंदोलनाचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना विधानसभा संघटक खुशालजी लांजेवार , शिवसेना तालुका प्रमुख आकाश भोयर , युवासेना तालुका प्रमुख प्रतिक किंदर्ले , विभाग प्रमुख सचिनजी लांडगे , उपविभाग प्रमुख संजय भोयर , प्रदिप कारेमोरे , रोशन हरकंडे , सुहास धारगावे , कार्तीक पडोऴे , सचिन मोरांडे , विशाल ढपकस , विकास मेश्राम , विशाल गोल्लर , शुभम वानखेडे , आयुष मोटघरे उपस्थीत होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular