Tuesday, June 28, 2022
Homeनागपुरकन्हान पत्रकारांच्या घरावर गुंडांचा प्राणघातक हमला.

कन्हान पत्रकारांच्या घरावर गुंडांचा प्राणघातक हमला.

कन्हान : – येथील ग्रामीण पत्रकार रमेश गोडघाटे यांच्या घरावर काही गावगुंडांनी अश्लिल शिवीगळ करित दरवाज्यावर लाथ, दगड व शस्त्राने मारून जिवे मारण्याचा प्राणघातक हमला करून घरा समोर असलेल्या कार चे काच फोडले.


सोमवार ला सकाळी ९ वाजता दरम्यान पत्रकार रमेश गोडघाटे हे आपल्या कुटुंबासह संताजी नगरातील आपल्या घरी असताना आरोपी बंटी शर्मा व दिपक गडे हे दोघे पत्रकार गोडघाटे यांच्या घरासमोर येऊन अश्लील भाषेत शिविगाळ व जेवे मारणारची धमकी देत होते. अचानक होत असलेल्या प्रकाराबद्दल पत्रकारा सह कुटुंबीय भयभीत झाले व आतुन दरवाजा बंद करून घेतला. तेव्हा बाहर निकल तुझे जानसे मारुंगा . म्हणत लाकडी दरवाज्यावर लाता, दगड व शस्त्राने मारून मेरी थाने मे शिकायत क्यो किया. मेरे धंदे के बारे मे पेपर मे न्युज क्यो छपाया म्हणत सदर गुंडांनी अंगणात उभी असलेल्या वेगनआर चारचाकी गाडी – एम एच क्र.- ३२८८ ची काच फोडली. व निघुन गेले. परत दहा मिनिटाने पुन्हा दोघेही आरोपी घटना स्थळी दुचाकीने आले असता त्यांना पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. पण त्यातील बंटी शर्मा हा कन्हान पोलीसांच्या हातात तुर्रा देत तावडीतून सुटून फरार झाला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर दिपक गडे याला अटक केली. कन्हान पोलीसांनी नगरातील नागरिकांच्या व फिर्यादी यांचे तक्रारीवरून दोन्ही आरोपी विरूध्द कलम २९४, ५०४, ५०६, ४२७, ३४ भादंवि नुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

1 COMMENT

Most Popular