Tuesday, June 28, 2022
Homeनागपुरआत्मा व उमेद अंतर्गत शेतकरी गट व महिला बचत गटांना ट्रायकोकार्ड किटचे...

आत्मा व उमेद अंतर्गत शेतकरी गट व महिला बचत गटांना ट्रायकोकार्ड किटचे वितरणआज दि.09/07/2021 रोजी पंचायत समिती सभागृह, भिवापूर येथे  मा. जिल्हाधिकारी साहेब व मा. प्रकल्प संचालक आत्मा नागपूर याच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत ट्रायकोग्रामा कार्डस निर्मितीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमास मा.सभापती श्रीमती ममताताई शेंडे, मा.पं.स.सदस्य श्री. राहुल मसराम,भिवापूर, मा.गटविकास अधिकारी श्रीमती माणिक हिमाने मॅडम, पंचायत समिती, भिवापूर यांच्या उपस्थितीत आत्मा व उमेद अंतर्गत स्थापित शेतकरी गट, महिला बचत गट, कृषी मित्र, कृषी सखी, प्रगतिशील शेतकरी यांना २० ट्रायकोकार्ड निर्मितीबाबतच्या किटचे वाटप करून सविस्तर मार्गदर्शन  करण्यात आले.


ट्रायकोग्रामा कार्ड वापरामुळे रासायनिक औषधांची फवारणी कमी होऊन खर्चात बचत होईल तसेच शेतकरी यांच्या उत्पादन वाढ होईल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. ट्रायकोकार्ड भाजीपाला पिके, फळे, खोड पोखरणाऱ्या अळी, मका लष्करी अळी, हरभरा घाटेअळी, धानावरील खोडकिडी, कापसावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करते. शेतकरी त्यांच्या शेतात वापरण्याइतपत अथवा व्यवसायिक स्वरूपात ट्रायकोकार्ड  तयार करू शकतात याबद्दल श्री सचिन गणवीर , सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) भिवापुर, व श्री रवींद्र शेंडे, तालुका अभियान व्यवस्थापक (उमेद) पं.स.भिवापुर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका व्यवस्थापक कु. आरती तिमांडे, आत्मा व उमेद अंतर्गत शेतकरी गट व महिला बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular