ब्रह्मपुरी…
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजने अंतर्गत अगदी 1500 रु तुटपुंज्या मानधनात जिल्हा परिषद व प्रायव्हेट शाळेत दुपारचे भोजन बनविणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी प्रचंड वाढलेल्या महागाईत जगावे कसे ? असा एक्ष प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे.संघटनेच्या अथक संघर्षातून 9 फेब्रुवारी च्या शासन निर्णय नुसार शापोआ कर्मचाऱ्यांच्या मानधनात एप्रिल महिन्या पासून 1000 रू.मासिक वाढ केलेली आहे .परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याने शापोआ कर्मचारी सरकार प्रती तीव्र नाराजी व्यक्त करत .कुटुंब चालण्या योग्य मानधन वाढ व किमान वेतन लागू करण्यात यावे यासह इतरही समस्यांवर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविणे व संघटना बळकट करण्यासाठीआयटक चे राज्य महासचिव कॉ.श्यामजी काळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात स्थानिक आयटक कार्यालय परवाना भवन नागपूर येथे 11 जून 2023 रोजी राज्य कार्यकारणी तथा प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर कॉ.विनोद झोडगे राज्य महासचिव शापोआ युनियन , कॉ.भगवान पाटील राज्य उपाधक्ष कोल्हापूर, कॉ.वनिता कुंठावार जिल्हा सचिव चंद्रपूर, कॉ.मुगाजी बुरुड राज्य उपाधक्ष परभणी, कॉ.शौकत भाई पठाण जिल्हा सचिव सातारा, कॉ.नामदेव शिंदे जिल्हा सचिव नांदेड,चंद्रकला पारवे सचिव, कॉ. कैलास घरडे अधक्ष नागपूर, माया मानकर,विलास ससाणे यवतमाळ,भद्रावती चे माजी नगरसेवक तथा आयटक चे संघटक कॉ राजू गैनवार, कॉ.करुणा गणवीर सचिव,रामचंद्र पाटील गोंदिया,जयमाला बेलगे सचिव वर्धा ,श्रीधर वाढई,कुंदा कोहपरे,बबन कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत कर्मचाऱ्यांन च्या विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली ज्या मध्ये कर्मचाऱ्यांना किमान 24 हजार वेतन देण्यात यावे,चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी, सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी,दर महिन्याला मानधन व इंधन बिल देण्यात यावे कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये,त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये ,सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी,सर्व शाळेत ग्यास सिलेंडर ,धान्यादि माल व खाद्य तेल उपलब्ध करून देण्यात यावे,दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे.12 महिन्याचे मानधन देण्यात यावे किमान वेतन मिळेपर्यंत दहा हजार रुपये मानधन वाढ लागू करण्यात यावी ,दिवाळी बोनस लागू करण्यात यावे तसेच संघटनेचे 2 रे राज्य अधिवेशन 18 व 19 नोव्हेंबर सातारा येथील महाबळेश्वर येथे घेण्याचे ठरले यासह आदी मागण्या विषही चर्चा करून 2023 हे वर्ष शापोआ कर्मचाऱ्यांनच्या मानधन वाढीचे असले पाहिजे असा निर्णय घेऊन येत्या 19 जून 2023 रोजी राज्यभर प्रत्येक जिल्हा परिषद कार्यालय वर मोर्चा, धरणा,निदर्शने करणार असल्याचे ठरले असून,त्या अनुसंगाने चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालय समोर विशाल धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती कॉ.श्यामजी काळे व कॉ विनोद झोडगे यांनी दिली.मोर्च्यात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयटक संघटनेने केला आहे.
बैठकीत कॉ.राजू गैनवार त्यांची पत्नी कॉ.वंदना हे भद्रावती विकास खंड अँद्योगिक बहुउद्देशीय ग्रामीण कारागीर सहकारी संस्थेच्या संचालक पदी अविरोध निवडून आले त्याबद्दल त्यांचे व संघटनेचे ईतर पदाधिकारी यांचे शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
बैठकीचे संचालन कॉ.लक्ष्मी वंजारी तर प्रास्ताविक कॉ.श्रीधर वाढई आभार कॉ.कैलास घरडे यांनी केले.