प्रतिपादन : श्रध्दांजली कार्यक्रम
प्रशांत राऊत
अर्हेरनवरगाव:-
स्व गोदरूपाटील जुमनाके हे आदिवासी समाजातील एक ज्येष्ठ,अनुभवी नेते होते.ते अत्यं शांत,मनमिळाऊ,मितभाषी , निर्मळ व निःस्वार्थ स्वभावाचे धनी होते त्यांनी सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात समाजासाठी भरीव कामगिरी केली .

गोंडी भाषा जतनासाठी केलेले कार्य फार मोठे समाजाकरिता योगदान आहे.तसेच समाजावर होणारे अन्यायाविरुद्ध ते नेहमीच आवाज उठवत,त्यामुळे त्यांचा राजकीय क्षेत्रात दबावगट होता.ते सर्वाचे नेते होते,अशा विभूतीचं जाणं म्हणजेच समाजाचं व देशाच्या विकासात अडसर येणं आहेआणि म्हणून त्यांचे कार्य लक्षात घेता आदिवासी समाजाची कधीही न भरून निघणारी पोकळी आहे.त्यांच्या आदर्श विचारांची प्रेरणा आदिवासी समाजाने समजून ते कार्य जीवित ठेवण्याची नितांत गरज आहे.हीच पाटील साहेबांना खरी श्रध्दांजली ठरेल तर दुसरी विभूती प्रा डी जे सिडाम हे अतिशय संवेदनशील,मितभाषी , सौजन्यपूर्ण व आदरपूर्वक असे व्यक्तिमत्व होते.हे दोन्ही विभूती प्रेरणादायी होते”
असे मौलिक विचार ब्रम्हपुरी येथील कवी डॉ धनराज खानोरकरांनी व्यक्त केले. ते पेठवार्ड येथिल आदिवासी समाज,गोंडवाना गणतंत्र पार्टी व आॅल इंडिया आदिवासी एम्लाॅईज फेडरेशन यांच्या वतीने आयोजित स्व गोदरूपाटील जुमनाके व प्रा डि जे सिडाम यांच्या सयुक्तिक श्रध्दांजली कार्यक्रमात बोलत होते
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ विजयकुमार खंडाते होते तर गोंगपा तालुकाध्यक्ष प्रा डॉ प्रकाश वट्टी,मनोहर दलांजे, कपूर नाईक,केशव घरत, गंगाधर मडावी रविंद्र सराटे,वासुदेव सराटे,संजय आडे,
थुट्टेजी,चिलबुलेजी,महिला मंडळ उपस्थित होते.यावेळी डॉ विजयकुमार खंडाते यांनी दोन्ही व्यक्तीविषयी आपल्या संवेदना व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली तर,डॉ प्रकाश वट्टी ह्यानी कार्यक्रमाचे आयोजन करून स्व गोदरु पाटील जुमनाके यांच्या जिवनकार्याचा सामाजिक , सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील समग्र जीवनपट उलगडून दाखविला तर प्रा डि जे सिडाम यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केले.
या कार्यक्रमाचे संचालन मनोहर दलांजे यानी केले तर कार्यक्रम घेण्यासाठी विनायक उईके यांनी आपले घराचे दालन मोकळे करुन दिले.या कार्यक्रम आयोजन करिता डॉ प्रकाश वट्टी डॉ खानोरकर,मनोहर दलांचे, डॉ रवी रणदिवे व गुरूदेव अलोणे राहुल मैंद व प्रशांत राऊत यांनी सहकार्य केले.