ब्रह्मपुरी
चंद्रपूर समाज कल्याण विभागा तर्फे वयोवृद्ध कलावंत मानधन निवड समितीवर सदस्य म्हणून किनी येतील सुदाम जगन भागडकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

कला अथवा सांस्कृतिक विषयावर अनुसरून असलेल्या व्यक्तीला सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते यामध्ये कलाक्षेत्रात असलेले हिरालाल पेंटर अरविंद झाडे यांच्यासह अनेक आठ जणांची सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे समजते मात्र सुदामजी भागडकर राहणार किनी यांच्या नियुक्तीबद्दल आपल्या यशाचे श्रेय महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह ठेकेदार सुरेश दरवे ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके माजी सरपंच पुंडलिक प्रधान
तथा काँग्रेस कार्यकर्त्यांनी व मित्रमंडळी सह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे