Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरसावली तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या...

सावली तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विजयी झालेल्या उमेदवारांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला

सावली ::
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे युवा नेते,
मा. श्री. श्रीकांतभाऊ भांगड़िया यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला तीन ही तालुक्यात भरघोस यश प्राप्त झाले.

या विजयाच्या पार्श्वभूमीवर काल सावली तालुक्यातील
मंगरमेंढा,सामदा बुज, मेहा, व्याहाड, थेरगाव, पालेबारसा, बोरमाळा, निफंद्रा,अंतरगाव, गायडोंगरी, इत्यादी गावात मा. श्री. श्रीकांतभाऊ भांगड़िया यांनी भेटी दिल्यात आणि विजयी उमेदवारांचा सत्कार करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. श्री.वसंतभाऊ वारजुकर,
सावली भाजपा तालुका अध्यक्ष श्री. अविनाश पाल,
जेष्ठ नेते तुकाराम पा. ठीकरे, सिंदेवाही भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पा.बोरकर, सिंदेवाही नगरपंचायत सदस्य हितेशभाऊ सूचक,भाजपा सहसचिव नामदेव भोयर,दिवाकर गेडाम,अरविंद निकेसर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विशाल करंडे, ब्रम्हपुरी विधानसभा भाजपा सोशल मीडिया संयोजक हार्दिक सूचक, राजू करकाडे, जावेद पठान तसेच सावली तालुक्यातील इतर पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular