Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरसावलीचा चेहरामोहरा बदलविणार ….पालक मंत्र्याची घोषणा

सावलीचा चेहरामोहरा बदलविणार ….पालक मंत्र्याची घोषणा


“पत्रकार परिषदेत दिली वेगवेगळ्या कामाची माहीती”
” पालकमंत्र्याच्या पत्रकार परिषदेत मात्र पत्रकाराच खुर्चीविना उभे”

सावली:: चंद्रपुर जिल्ह्याचे पालक मंत्री यांनी सावली येथे नुकताच पत्रकार परिषद घेतली व वेगवेगळ्या विकास कामातुन सावली शहराचा चेहरा मोहरा बदलवून दाखविण्याचा संकल्प केला , यात सावली मध्ये पाण्याचे मिटर लावणे, न.प.ला अग्नीशामक गाडी (८५ लाख) देणे, सावलीत ई लायब्ररी करणे, क्रिडा संकुल बांधणे , सोबतच सावली तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेले आसोलामेंढा तलावाचे सौंदर्यीकरण व बोंटींग व्यवस्था( ३५ कोटी) , सावली शहरात होत असलेल्या डिवायडर ची उंची वाढविणे आदी कामांची माहीती दिली ‌.


पालकमंत्र्यांनी सावली चा विकास करण्यासाठी काही उद्योग असले पाहीजेत म्हणुन साखर उद्योग इथे सुरु करणार पण त्या साठी महसुलची जागा नाही, एम आय डि सी साठी पण जागा शोधणे सुरु आहे याची पण माहीती दिली सोबतच खादी ग्रामोद्योग चे सुशोभिकरण करणे , आदी ची माहीती दिली ,विविध विभागांचा आढावा यात घेण्यात आला,
पालकमंत्र्याची पत्रकार परिषदेत मात्र पत्रकारांना उभे राहण्याची पाळी आली, नेहमीच कार्यक्रतर्यांचा लवाजामा असतो ,पत्रकार परिषद मध्ये कार्यक्रर्त खुर्ची वर बसुन दिसले ,मात्र पत्रकार उभे ,हा चर्चेचा विषय ठरला‌…..

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular