
गडचांदूर
:- सतिश बिडकर कोरपना तालुक्यात सर्वात मोठी गडचांदूर नगरपरिषदेची १२ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.मात्र याठिकाणी विरोधी पक्ष नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकुन सभा त्याग केला.याविषयी सविस्तर असे की,मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी विरोधी पक्ष नगरसेवकांनी नगराध्यक्षांकडे अर्जाद्वारे विनंती केली होती की,सभा सुरू करण्यापूर्वी स्थाई समिती ठरावाची प्रत व स्थाई समितीचे वाचन करावे. परंतु दोन सभा झाल्या तरीपण त्यांनी प्रत दिली नाही व सभेत वाचन सुद्धा केले नाही. आम्ही विरोधी नगरसेवक असल्याने स्थाई समिती सदस्य नाही.यामुळे नगरपरिषदेत कुठे आणि काय काम सुरू आहे याबाबतची माहिती आम्हाला राहत नाही.जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिलेले नगरसेवक असल्याने आम्हाला याठिकाणी चाललेल्या कामांची पुरेपूर माहिती असने गरजेचे आहे.त्यासाठी आम्ही सदर प्रत मागितली परंतु यांनी देण्यास टाळाटाळ केली.आयोजित आज (१२ ता.)ला सभा सुरु करण्यापुर्वी आम्ही स्थाई समितीची प्रत मागितली परंतु "तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्रत घेवू शकता,परंतु मी तुम्हाला प्रत देणार नाही." अशाप्रकारे उद्धट उत्तर नगराध्यक्षांनी दिलं. अशी माहिती देण्यात आली असून त्यावरून आम्ही सर्व भाजप व शिवसेनेचे विरोधी पक्ष नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला आणि यासंबंधीचे पत्र देऊन सभा त्याग करून बाहेर निघालो.आम्ही सभागृहातून बाहेर निघताना यांना सभा घेण्यासाठी कोरम नव्हता,मग कोरम पुर्ण नसतानाही जर यांनी सभेत ठराव घेतलाच तर तो आम्हांस आमान्य राहिल.आणि याच्या विरोधात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिलीत जाणार असल्याची माहिती नगरसेवक अरूण डोहे सह इतरांनी दिली आहे. ----------//----------
दरम्यान काही वेळेनंतर सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेवकाचे आगमन झाले आणि सभा घेण्यात आल्याचे कळते.आता विरोधी पक्ष नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे)