Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरसंचालक मंडळाने केला लाखोंचा भ्रष्टाचार

संचालक मंडळाने केला लाखोंचा भ्रष्टाचार

पत्र परिषदेत सदस्यांचा आरोप

सहायक निबंधक कार्यालयाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

ब्रम्हपुरी : विद्यमान संचालक मंडळाने आपल्या पाच वर्षाच्या कालावधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. याबाबद सहायक निबंधक कार्यालय चंद्रपूर यांच्याकडे मागील वर्षभरात अनेकदा तक्रार केली. स्मरणपत्र दिले. चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई किंवा चौकशी करण्यात आली नाही. असा आरोप सर्वोदय मछचींद्र सहकारी संस्था मेंडकीच्या सदस्यांनी पत्र परिषदेत केला.


सर्वोदय मछचींद्र सहकारी संस्था मर्या मेंडकी र. न. १०९६ सदर संस्थेच्या कर्यकाळी मंडळाने सन २०१८- २०१९ या कालावधीत झालेल्या व्यवहाराचा उपयोग स्वखर्चासाठी केला. असा आरोप सदस्यांनी सोमवारी ( दि. २५ ) घेतलेल्या पत्र परिषदेत केला आहे. याबाबद शामराव वैरकर व सर्व संस्था सदस्यांनी मिळून ७/१/२०२० ला सहायक निबंधक कार्यालय चंद्रपूर यांना पत्र देऊन संचालक मंडळाने भ्रष्टाचार केल्याबाबद तक्रार करून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून २५० सभासदांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
सहायक निबंधक कार्यालय चंद्रपूर यांनी ३०/१/२० ला लेखी पत्र पाठवून कोणतीही चौकशी न करता सभासदांची मतदार यादी मागून सदस्यांची दिशाभूल केली.१५/२/२० ला सहायक निबंधक कार्यालय चंद्रपूर यांना स्मरणपत्र देण्यात आले. सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी सहायक निबंधक कार्यालय चंद्रपूर यांनी दि. ३/३/२० ला तक्रारकर्ते सभासद व संचालक मंडळाची सयुक्त बैठक घेतली. यावेळी कोणतीही चौकशी न करता सात दिवसात चौकशी करण्याचे तोंडी सांगितले. सदर कार्यालयाकडून संस्थेची निवडणूक घेण्याकरिता १० हजार रुपये भरण्याचे पत्र दि. ३/६/२० ला सदस्यांना प्राप्त झाले. त्यानुसार १० हजार रुपये भरण्यात आले. मात्र, ६ जून २०२० ला कार्यकाळ संपूनही अद्याप निवडणूक घेण्यात आली नाही.
वैरकर व इतर सदस्यांनी शेवटचे स्मरणपत्र दि. ११/७/२० ला सहायक निबंधक कार्यालय चंद्रपूर यांना पाठऊन २५० सदस्यांची उपजीविका चालणारी संस्था मोडकळीस येऊ नये याकरिता पत्र दिले. मात्र, सदर कार्यालयाने उडवाउडवीची उत्तरे दिली. असा आरोप सदस्यांनी पत्र परिषदेत केला.यावेळी सदस्यांनी संस्थेची दोन लाखांची मदत ठेव संचालकांनी परस्पर काढली तसेच संस्थेच्या नावाने कर्ज उचलले असल्याचे सांगितले. सन २०१८- २०१९ या वर्षात कोणतीही सभा घेण्यात आली नाही. कोणताही ठराव घेण्यात आला नाही. तरीसुद्धा १ लाख रुपयांचा कर्ज उचलले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. संस्थेचे वार्षिक उत्पन्न खर्च वजा जाता ५ लाखांच्या घरात आहे. याशिवाय अनेक उत्पन्नाचे साधन आहेत. मात्र, सध्या संस्थेकडे काहीही शिल्लक नसल्याने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार तत्कालीन संचालक मंडळाने केला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
चौकशी करून उचित कारवाई करण्यात आली नाही तर सर्व २५० सदस्य आपल्या कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असा इशाराही यावेळी देण्यात आला. पत्र परिषदेला शामराव दुमाने, बाळकृष्ण दुमाने, डोमुजी भोयर आदी सदस्य उपस्थित होते.

        प्रतिक्रिया

याबाबदची चौकशी करण्यासाठी संचालक मंडळाला रेकॉर्ड मागितला आहे. तसे नोटीस देण्यात येऊन कलम ७८ नुसार कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. योग्य चौकशी करून उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– आर. एन. पोथारे
सहायक निबंधक
सहकारी संस्था (दुग्ध) चंद्रपूर

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular