हिंदू संस्कृतीत श्रावण सोमवारला अनन्य साधारण महत्त्व:
बहुतेक कुटुंबाकडुन घरी भोजनदानाचा कार्यक्रम:
विनोद दोनाडकर
ब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये श्रावणमाशं महिन्यातील विशेषता सोमवारला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते

हिंदु संस्कृतीनुसार शहरासह अनेक खेडेगावांमध्ये महादेव शंकराची दुधाने अभिषेक बेल फूल वाहून महापूजा केली जाते
तर बर्याचश्या घरी सोमवारला ऊपवास पकडून संध्याकाळी उपवास पूर्ण केल्या जातो त्यावेळी मात्र भोजन दान म्हणून जवळचे नातेवाईक असोत अथवा मित्रमंडळी यांना जेवणासाठी बोलावले जाते व दहा लोकांमध्ये आपला उपवास सोडला जातो अशा प्रकारचे कार्यक्रमही बहुतांशी कुटुंबात कडून आयोजित केले जात असतात
तर विशेषतः ग्रामीण भागातील गावकरी भजनी मंडळी यांच्या कडून गाव दिंडी गावातील मुख्य रस्त्यांनी फेरी काढली जाते त्यात बाल गोपाल व पुरुष मंडळी सहभागी होत असतात शिवाय प्रत्येक कुटुंबातील घरासमोर दिंडीतील महाराज लोकांचे पवित्र पाय धुतले जातात त्यातून मात्र आपल्यावर ओडवलेल्या अनेक व्याधी पासून मुक्तता होत असल्याचे बोलले जाते शिवाय हे काम पुण्याचे असल्याचे मानतात संध्याकाळी गावातील श्रद्धेचा भाग असलेल्या मंदिरामध्ये आरती करून प्रसादाने कार्यक्रमाची सांगता केली जाते ह्या व्यतिरिक्त सुद्धा ग्रामीण भागात ठरलेल्या दिवसानुसार सोमवार गुरुवार शनिवार मंगळवार अशा विशेष दिवस ठरवून ५ पळे (अथवा पोलो) सव्वा महिन्यापर्यंत पाडले जाते पोळा संपला श्रावणमाशची समाप्ती होते ही दिनचर्या मात्र सव्वा महिन्यापर्यंत ग्रामीण भागात विशेष प्रमाणात पाडली जाते एवढे मात्र विशेष