कोरपना:- सतिश बिडकर


विश्राम गृह चंद्रपूर येथे प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर च्या वतीने रुग्नमित्र गजू कुबडे यांच्या नेतृत्वात भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी चंद्रपूर येथील जिल्ह्यातील शेकडो कार्यकत्यांच्या हाताला सेवाबंधन बांधून प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला. याव वेळ इक कुबडे म्हणाले की प्रहार हा एक पक्ष नसून परिवार आहे याचं प्रहार परिवारात आपले सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत आहे तर प्रहरच्या माध्यमातून समाजाची, गरिबांची, शेतकऱ्यांची, अपंगांची, निराधार ची सेवा सेवा कशी घडेल यावर मार्गदर्शन करण्यात आले समाजाची सेवा आपल्या प्रहार तर्फे घडावी म्हणून सेवाबंधन बांधून कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले .
चंद्रपूर जिल्हा त गाव तिथे शाखा घर तिथे प्रहार सेवक असा उपक्रम राबविला जाईल असे कुबडे यांनी आपल्या प्रहार कार्यकर्त्यांना संबोधले
मातोश्री मीनाताई ठाकरे कामगार जोडो महासंवाद अभियान मा.ना. बच्चू कडू यांच्या संकलपनेतून
मा.ना.बच्चुभाऊ कडु राज्यमंत्री हे २५/२/२०२१ ला चंद्रपुर जिल्हा दौऱ्यावर येत आहे राज्य मंत्री श्री बच्चु कडू यांच्या संकल्पनेतून चंद्रपुर साहित अनेक जिल्ह्यांमध्ये मातोश्री मीनाताई ठाकरे कामगार जोडो महासंवाद अभियान राबविण्यात येत आहे या अभियानात जलसंपदा,शिक्षण,महिला व बालविकास,ईतर बहुजन मागास कल्याण विभाग , कामगार विभाग या विभागांचा व विविध योजना सामान्य नागरिक यांचे प्रश्न समजुन घेण्यात येणार आहेत या अभियानात अनाथ अपंग मेळावा, महिला व बालविकास विभाग यांचा शिशु गृह, बालगृह, ईतर संस्थांना भेटी देऊन अडी अडचणी समजून घेणे, धरण व पुनर्वसन ग्रस्त गाव भेटी, भटक्या विमुक्त जाती जमाती गावांना भेटी,वीटभट्टी कामगार भेटी व नोंदणी, घरेलु महिला कामगार मेळावा व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहेत दिनांक १८/०२/२०२१ ला सिंदखेराजा माॅ जिजाऊ जन्मस्थळा पासून हे अभियान सुरू करण्यात येणार आहे येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यात सकाळी सहा वाजे पासून तर रात्री आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे