Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरव्याहाड खुर्द ग्रामपंचायतीवर कांग्रेसची सत्ता, ११ पैकी १० जागावर विजय

व्याहाड खुर्द ग्रामपंचायतीवर कांग्रेसची सत्ता, ११ पैकी १० जागावर विजय

:: सावली तालुक्यातील मोठी व राजकीय दृष्टया महत्त्वाची समजल्या जाणा-या व्याहाड खुर्द ग्रामपंचायतीवर कांग्रेसने आपली सत्ता राखण्यात यश मिळविले आहे, ११पैकी १० जागांवर दणदणीत विजय मिळवून एकहाती सत्तेवर ताबा मिळविला आहे.


पालकमंत्री विजय वड्डेटिवार यांचे कट्टर समर्थक , तरुण कांग्रेसचे युवा नेते, निखिल सुरमवार यांच्या नेतृत्वाखाली कांग्रेसने ही निवडणुक लढविली व एकहाती सत्तावर ताबा मिळविला,त्यांना शह देण्यासाठी क्षेत्राच्या जि.प सदस्या योगीता डबले व कविंद्र रोहनकर यांनी भाजपा समर्पित शेतकरी किसान आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरविले,तर ‌राका कडून उरकुडे यांनी शेतकरी शेतमजुर आघाडी कडुन रिंगणात उडी घेतली,इथे तिहेरी लढत होणार असे चित्र दिसत होते ,परंतु कांग्रेसने ग्रामविकास परिवर्तन पानल तयार करुन कांग्रेसचे निखिल सुरमवार यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची करीत विरोधकांना धुळ चाळली, यात कांग्रेसचे माजी सरपंच हरिदास चिवंडे, केशव भरडकर,माजी सदस्य राजेश टोंगे,कुंडलिक मडावी,नलिनी करकाडे,सुनीता उरकुडे, पनिला मानकर,बिके, नगमा वाढ ई,पिंकी बरोके आदी विजय उमेदवार आहेत,
व्याहाड खुर्द ग्रामपंचायतीवर तालुक्यात अनेकांच्या नजरा लागल्या होत्या ,ग्रामपंचायती मध्ये यावेळेस काही बदल होईल, पण मागच्या प्रमाणे यावेळेस सुध्दा कांग्रेसने बाजी मारली,मतमोजणीत इतर गावातुन भाजपा समर्पित आघाडीचे उमेदवार निवडुण येत असताना, व्याहाड खुर्द मध्ये सुध्दा काही बदल होणार असे जनतेला वाटु लागले आणि अनेकांच्या नजरा व्याहाड खुर्द कडे वळल्या परंतुकृषी उत्तपन्न बाजार समितीचे संचालक ,कांग्रसचे युवा नेते निखिल सुरमवार,प.स.सदस्या मनिषा जवादे, टोंगे,आशिष पुण्यपवारआदींनी सहकार्य केले

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular