Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरवैराग्यमूर्ती संत गाडगेबाब खरे प्रेरक समाजसंत

वैराग्यमूर्ती संत गाडगेबाब खरे प्रेरक समाजसंत

प्राचार्य,डॉ एन एस कोकोडे : जयंतीउत्सव कार्यक्रम
ब्रह्मपुरी / ता प्र
” संत गाडगेबाबा आयुष्यभर समाजासाठी चंदनासारखे झिजले.हातात खराटे घेऊन स्वच्छतेचा महामंञ दिला.स्वतः पुढाकार घेऊन हातातल्या गाडग्यातून जमा झालेल्या धनातून गोरगरिबांसाठी धर्मशाळा उभ्या केल्या,अशा महामानवांकडून आपण प्रेरणा घेऊन आपली पुढील वाटचाल केली पाहिजे, कारण ते खरे प्रेरक समाजसंत गाडगेबाबा होत ” असे बहूमोल विचार प्राचार्य,डाॅ एन एस कोकेडेंनी व्यक्त केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात जयंतीउत्सव कार्यक्रमात बोलत होते.


प्रथमतः संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला प्राचार्य,डॉ कोकोडे व उपप्राचार्य, डॉ डी एच गहाणेंनी पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी प्राचार्य,डाॅ हर्षा कानफाडे,डॉ मोहन वाडेकर,डाॅ असलम शेख, डॉ राजेंद्र डांगे,डाॅ रेखा मेश्राम, अधीक्षक संगीता ठाकरे, प्रा आनंद भोयर, प्राध्यापकवृन्द व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ कुलजितसिंग शर्मा, डॉ धनराज खानोरकर,डाॅ युवराज मेश्राम, प्रा रुपेश वाकोडीकर,जगदिश गुरनुले, रामटेके, विजू यांनी परिश्रम घेतले

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular