Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरविरोधी गटातील माजी उपसरपंचने घडविले माणुसकीचे दर्शन

विरोधी गटातील माजी उपसरपंचने घडविले माणुसकीचे दर्शन

ब्रह्मपुरी (. विनोद दोनाडकर)
काही नाते काही रिश्ते किती भाऊक असतात हे चांगल्या माणसाच्या वर्तणूक वरून लक्षात येते राजकीय दृष्ट्या कितीही विरोध असला तरी कधी !कधी! गावखेड्यात त्या नात्यांची जपणूक करताना किती अडचणींचा सामना करावा लागत आहे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक आहे असा प्रसंग प्रत्यक्षात अनुभवण्यास आला तर नवल वाटल्याशिवाय राहत नाही.


ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हटल्या की प्रत्येक खेडे गावातील राजकारण तापत असते जवळपास बहुतांशी गावात
काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी दोन विरोधी गट एकमेकाच्या विरोधात असतातच व ह्या दोन्ही गटाकडून आप आपले गावावर पाच वर्ष वर्चस्व ठेवण्यासाठी अस्तित्वाची लढाई करत आरोप-प्रत्यारोप करतात मात्र त्यात सामान्य नागरिक भरडला जातो त्यात चुलता काका भाऊ आजोबा नातू आई-वडील ताई आक्का मामा मामी ही रिश्तेदारी त्या कालावधीसाठी गहाळ झालेली असते कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी देतांना तो उमेदवार जास्तीत जास्त मतदारांना कसा आवडेल याची खात्री करून समीकरण जुळवले जाते मात्र याच्यात कधी कधी ही बाब योग्य ठरते तर कधी ठरतय नाही कारण की ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की कधी पक्षावर तर कधी रिश्तेदारी वर याचा निर्णय मतदार घेत असतात यापैकी ब्रह्मपुरी तालुक्यातील रण मोचन ग्रामपंचायत राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते या गावचे समीकरण दर पाच वर्षांनी बदलत असते मागच्या वेळी काँग्रेस गटाचे सरपंच उपसरपंच होते तर यावर्षी मात्र चित्र बदल्याने भाजपाचे सरपंच उपसरपंच झाले त्यात भाजपाचे पाच तर काँग्रेस गटाचे दोन सदस्य निवडून आले दिनांक 12 फेब्रुवारी ला झालेल्या सरपंच उपसरपंच निवडणुकीत नीलिमा राऊत सरपंच तर सदाशिव ठाकरे उपसरपंच झाले त्यावेळी ग्रामपंचायतचे सर्व नवनिर्वाचित ग्रा प सदस्य उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर भाजपाची सत्ता आल्याने भाजप कार्यकर्त्यांनी सरपंच उपसरपंच व भाजपातील सदस्यांचा सत्कार सोहळा ग्रामपंचायत च्या समोर गावातील कार्यकर्त्याकडून ठेवण्यात आला होता त्यात काँग्रेस गटातील संजय प्रधान व अश्विनी दोनाडकर या ग्रामपंचायत च्या समोर आल्यानंतर चक्क विरोधी पक्षाचे( भाजपाचे) माजी उपसरपंच राहिलेले योगेश पिलारे यांनी पहिल्यांदा भाजपाच्या उमेदवारांचा सत्कार सोहळा करण्याआधी विरोधी गटातील काँग्रेस प्रणित ह्या दोन्ही नवनिर्वाचित सदस्यांना गुलाल लावण्यास सुरुवात केली त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला मात्र विरोधी गटातील त्या दोन्ही ग्रा प नवनिर्वाचित सदस्यांनी कही खुशी कही गम सांगत रिश्तेदारी ने हसत हसत गुलाल लावला आणि विरोधकांनी तो स्वीकारही केला आम्ही मामी तुमच्या सोबत नाही का? सांगत गाव पातळीवर रिश्तेदारी व नातेसंबंध कसे टिकवले जातात याचा प्रत्यय प्रत्यक्षात आणीत माणुसकीचे दर्शन घडवले एवढे मात्र खरे! जन् माणसाकडून योगेश पिलारे यांचे कौतुक होत आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular