Saturday, June 25, 2022
Homeचंद्रपुरवाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फाउंडेशन गडचांदूर तर्फे वाटर फ़ॉर बर्ड ( पक्षी...

वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फाउंडेशन गडचांदूर तर्फे वाटर फ़ॉर बर्ड ( पक्षी घाघर) अभियान
पक्षाना पाणी ठेवण्याचे आवाहन


गडचांदूर:- उन्हाचा पारा दिवसने दिवस वाढत असून , पक्षाना तहान भागविन्यासाठी वाइल्डलाइफ इनवारमेंट कॉन्झरवेशन नेचरिंग फाउंडेशन गडचांदूर वतीने दरवर्षी प्रमाणे , वाटर फ़ॉर बर्ड्स अभियान सुरू केले आहे ,

शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे अभियान राबविले जात असल्याची माहिती वी कैन फाउंडेशनच्या सदस्यानि दिली आहे , नेहमी समाजउपयोगी, पर्यावरण ,वन्यजीव संवर्धन कार्यात समोर असणाऱ्या वी कैन फाउंडेशन संस्थे मार्फ़त दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो , विशेष म्हणजे जख्मी पक्षु पक्षी यांना उपचार करून निसर्ग सानिध्यात सोडण्याचे काम वी कैन फाउंडेशन सतत सुरु असते , लोकांमध्ये जनजागृती केली जाते. उन्हाळा वाढत असून, नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर दाना-पाणी ठेवण्याचे आवाहन वी कैन फाउंडेशन वतीने करण्यात आले आहे,शहरी भागात नागरिकांनी घराच्या टेरेसवर गॅलरीमध्ये, झाड़ावर छोट्याशा भांड्यांमध्ये दाना आणि पाणी ठेवल्यास चिमण्यांसह आपल्या सभोवताल पक्षाचा कीलबिलाट असेल व पक्षी संवर्धन करिता महत्वाचे ठरेल, चिमणी-पाखरांसाठी आपल्या छतावर, गॅलरीत, अंगणात दाना-पाणी ठेवून वाटर फ़ॉर बर्ड्स या अभियानात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले आहे .

Previous article27/02/2021
Next article28/03/2021
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular