राजुरा (ता.प्र) :— रामचंद्रराव धोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करुन मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला.

या प्रसंगी रामचंद्रराव धोटे महाविद्यालये प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, जुनियर काॅलेजचे प्राचार्य समिर पठाण, प्रा. देवानंद चुनारकर, प्रा. यश्वीनी घोटेकर, लिपिक मिथलेश मुनगंटीवार, शिक्षकेतर कर्मचारी मनोज ठाकरे, भुषण चौधरी यासह विद्यार्थी उपस्थित होते.