100 गरजू नागरिकांना अण्णधान्य किट वाटप आणि 102 शिवसैनिकांनी केले रक्तदान
गडचांदूर –
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य राजुरा शिवसेनेच्या वतीने 80% समाजकारण आणि 20% राजकारण या परंपरेला साजेशे भव्य रक्तदान शिबीर आणि अन्नधान्य किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये तालुक्यातील 102 शिवसैनिकांनी रक्तदान केले तर 100 गरजू व्यक्तींना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.
रक्तदात्यांना टी शर्ट आणि खाऊ किट देऊन प्रोत्साहन पत्र देण्यात आले.
राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात व आयोजक शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव चापले, शिवसेना तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर,शिवसेना शहर प्रमुख निलेश गंपावार,युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, शिवसेना शहर समन्वयक बबलू चव्हाण,विभाग प्रमुख अजय साकीनाला, अविनाश जाधव जिवती, सरपंच आशाताई उरकुडे,संगीता विधाते ग्रा प सदस्य रामपूर, लता डाखरे ग्रा प सदस्य रामपूर,वनिता येनूरकर,रवी बत्तूला राजू काटम, बालाजी विधाते, प्रवीण राठोड, मारोती गायकवाड,गणेश चोथले,श्रीनिवास करेगला,दीपक येरणे, गणेश परसूतकर, अनिकेत गिरसावडे, प्रकाश ठावरी, गोपी बोरकुटे, अतुल खनके,श्रावण गोरे,आशिष मालेकर, रुपेश गोहने, सुधाकर कुंभे, मोरेश्वर वांढरे, राहुल माणुसमारे, निखिल माणुसमारे, संजय दिगदोदिलवार, रवींद्र खेडेकर, मनोज कुरवटकर, दौलत लोणारे, विलास सातपुते,बाळू विद्दे, समाधान कोरडे,समाधान ढुमने आणि मंगेश पाहानपटे, राजू लोणारे आणि शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.