Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरराजुरा नगर परिषदेचे १ लाख ४५ हजाराचे शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर.

राजुरा नगर परिषदेचे १ लाख ४५ हजाराचे शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर.

राजुरा नगर परिषद राजुरा येथे आज संपन्न झालेल्या विशेष सर्वसाधारण अंदाजपत्रकीय सभेत राजुरा नगर परिषदेतील २०२१ — २०२२ या वर्षीचा अंदाजपत्रक नगराध्यक्ष अरूण धोटे यांनी सभेसमोर सादर केले. सर्वानुमते अंदाजपत्रक मान्य करण्यात आले.


यामध्ये एकुण उत्पन्न ६५ कोटी २४ लाख २७ हजार १०० व खर्च ६५ कोटी २२ लाख ८१ हजार ७०० असून १ लाख ४५ हजार ४०० चे शिल्लकी बजेट सादर करण्यात आले.
यात नगर परिषद कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी १० कोटी, होमिओपॅथी दवाखान्यासाठी ७ लाख, ग्रंथालय पुस्तकासाठी १० लाख, प्रधानमंत्री आवास योजना ३ कोटी, कापनगाव नाला बंधारा बांधकाम ५० लाख, रामनगर काॅलणी वाचनालय बांधकाम, इंदिरा शाळे मागील जागेवर बगिचा व खुले रंगमंचाचे बांधकाम, इंदिरा नगर येथे स्मशान, कब्रस्थान बांधकाम, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थानांतरन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची जागा वाढवून सौंदर्यीकरण, राज्य सरोवर तलाव सौंदर्यीकरण १ कोटी रुपयांची विकास कामे व अन्य महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी विशेष कार्यप्रणालीद्वारे यंत्रणा राबवून उद्दिष्ट पार पाडण्याचा मनोदय नगराध्यक्षांनी व्यक्त केला आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष स्व. मंगला आत्राम यांच्या फोटोचे सभागृहात अनावरण करण्यात आले. व स्व. प्रा. अनिल ठाकूरवार यांचे निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरूवात करण्यात आली.
सदर अंदाजपत्रक तयार करण्यासाठी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक , लेखापाल अश्विन भोई यांनी सहकार्य केले. अंदाजपत्रकीय सभेला उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती हरजितसिंग संधू, आनंद दासरी, वज्रमाला बतकमवार, राधेश्याम अडानिया, विरोधी पक्षनेते रमेश नळे, विजय जांभुळकर, रवी जामुनकर व सर्व सन्मानीय सदस्य नगरसेवक, नगरसेविका व सर्व विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular