Sunday, May 29, 2022
Homeचंद्रपुरराजुरा काँग्रेस कमिटी तर्फे स्वर्गीय राजीव गांधी जयंती संपन्न.

राजुरा काँग्रेस कमिटी तर्फे स्वर्गीय राजीव गांधी जयंती संपन्न.जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यकर्ते प्रतिज्ञेद्वारे संकल्पबध्द.

राजुरा :– २० आँगस्ट २०२१
सकाळी ठिक १०
वाजता आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली तालुका काँग्रेस कमीटी राजुरा च्या वतीने काँग्रेस कार्यालय, गांधी भवन राजुरा येथे भारतीय संगणक तंत्रज्ञान, दूरसंचार क्रांतीचे प्रणेते भारताचे लोकप्रिय माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.


या प्रसंगी उपस्थित सर्व सदस्यांनी राजीवजी गांधी जयंतीनिमित्त संकल्पबध्द होत जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश इत्यादी सर्व प्रकारच्या भेदभाव न पाडता भारतीय जनतेच्या भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी सदैव काम करीन, वैयक्तिक व सामुहिक मतभेद हिंसेचा मार्ग न अवलंबिता विचार विनिमय आणि संवैधानिक मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करिन अशी प्रतिज्ञा घेतली.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कविता उपरे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, सेवादलाचे अध्यक्ष दिनकर कर्णेवार, महिला सेवादल अध्यक्ष अर्चना गर्गेलवार, सं. गां. नि. यो. अध्यक्ष साईनाथ बतकमावार, काँ. ओबीसी वि. ग्रा. जिल्हाध्यक्ष तथा कार्याध्यक्ष नंदकिशोर वढई, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, संदेश करमरकर, धनराज चिंचीलोकर, पंढरी चन्ने, ॲड. चंद्रशेखर चांदेकर, मतीन कुरेशी, अभिजीत धोटे, उमेश गोरे, अंनाता तजाने, पुनम गिरसावळी, योगिता मटाले, सारंग गिरसावळे यासह अनेकांची उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular