Sunday, May 29, 2022
Homeचंद्रपुररणमोचन फाट्यालगत असलेल्या नादुरुस्त रोड तातडीने दुरुस्त करा:

रणमोचन फाट्यालगत असलेल्या नादुरुस्त रोड तातडीने दुरुस्त करा:

पोलीस निरीक्षक रोशन यादव यांची कंपनीच्या मॅनेजरला सूचना
ब्रह्मपुरी:
ब्रह्मपुरी

आरमोरी महामार्गावरील रणमोचन ते जुगनाळा फाट्या जवळील जवळपास ३०० ते ४०० मीटर एक पदरी रोड मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात निकामी झाला आहे त्यामुळे सदर महामार्गावरून केवळ एकाच बाजूने वाहतूक सुरू असून सदर ठिकाणी बरेचसे अपघात घडले आहेत यात बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागला असून ५ ते ६ व्यक्तींना अपंगत्व आलेले आहे गेल्या दोन दिवसापूर्वी दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला असून एकाला अपंगत्व आले आहे ह्याच बाबीचा विचार करीत
संभाव्य धोका लक्षात घेता ब्रह्मपुरी आरमोरी महामार्गाची त्वरित दुरुस्तीची नितांत गरज भासत आहे यापुढे कोणत्या व्यक्तीची जीवित हानी होणार नाही त्यामुळे आपण याचा विचार करून आठ ते दहा दिवसात सदर रोड चे काम पूर्ण करावे अशा सूचना अजवानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जनरल मॅनेजर दिलीप कुमार वाघ यांना ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी प्रत्यक्षदर्शी घटनास्थळावर वस्तुस्थितीची स्वता पाहणी करण्यास भाग पाडले यावेळी गुरुवे मॅडम इंजिनिअर नॅशनल हायवे आवळे साहेब शाखा अभियंता दिलीप कुमार वाघ साहेब व्यवस्थापक मे अजवानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मस्के साहेब उपव्यवस्थापक यांची उपस्थिती होती त्यांनी लवकर तातडीने आठ ते दहा दिवसात काम चालू करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले
बॉक्समध्ये:
विशेष म्हणजे सदर रोडचे टेंडर त्यावेळी अजवानी कंपनीला होते २०१७ मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली व २०१९ मध्ये काम पूर्ण करण्यात आले असून तसा अहवाल शासनासमोर सादर करण्यात आलाअसल्याचे कळते
केवळ डागडुजीचे काम सदर कंपनीकडे बाकी आहे मात्र आलेल्या महापुराने रोड एक पदरी निकामी झाल्याने याचे टेंडर आता दुसऱ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मिळाली असल्याची माहिती सध्या पुढे येत आहे
बॉक्स मध्ये:
इथले अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन संबंधित कंपनीने तातडीने रोडचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे शिवाय ही कंपनीची नैतिक जबाबदारी पण आहे अशा प्रकारची पुन्हा अशी कोणती घटना उद्भभवली तर सबंधित प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या जबाबदार राहणार आहे मग मात्र आम्ही नक्कीच कारवाई करू शकतो
रोशन यादव
पोलीस इन्स्पेक्टर पोलीस ठाणे ब्रह्मपुरी

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular