Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरयुवकांनी शेतशिवारात गळफास घेऊन केली आत्महत्या

युवकांनी शेतशिवारात गळफास घेऊन केली आत्महत्या

राजुरा : विरुर स्टेशन येथील गुलाब दत्तू गोहने ( 35 ) यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली असून मंगळवार सकाळी 7 वाजता च्या सुमारास घटना उघड झाली.

राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील गुलाब गोहणे हा शौचालयात जातो म्हणून रात्री दहा वाजताच्या सुमारास घरून निघाला थोड्यावेळाने येईल म्हणून घरचे मंडळी निश्चित होऊन झोपी गेले मात्र सकाळ होऊनही गुलाब घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केली शेतातील झाडाला गळफास लावून असल्याचे शेताजवळील एका शेतकऱ्याने सांगितले तेव्हा याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस ठाण्याचे ठाणेदार कृष्ण कुमार तिवारी सदानंद वडतकर व त्याचे सहकारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी राजुरा येथे पाठवण्यात आले गुलाब गोहने यांला दोन एकर शेत जमीन आहे कर्ज काढून दुसऱ्या शेतात ठेक्याने शेती करत होता मागील तीन वर्षापासून सततची होणारी नापिकी यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता त्याच्यामागे आई वडील भाऊ पत्नी व दोन मुले असा परिवार आहे आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नसून पुढील तपास कृष्ण कुमार तिवारी यांचे मार्गदर्शनात सदानंद वडतकर हे करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular