Monday, June 27, 2022
Homeचंद्रपुरयुनिट सोडा , आता लागु या दारू च्या मागे

युनिट सोडा , आता लागु या दारू च्या मागे

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्य प्रणाली वरती समाजवादी पक्षा तर्फे टोला

चंद्रपूर : 1 एप्रिल 2015 पासुन चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी झाली त्यानंतर अनेक दारू विक्रेत्या चंद्रपूर जिल्ह्यात सक्रिय झालेत मागील 5 वर्षात चंद्रपूर जिल्हयात पोलिस प्रशासन व दारूबंदी विभागांनी जवळपास 100 करोड रुपये ची दारू जप्त केली व नष्ट केल्याची प्रेसनोट जाहिर केली .

आज चंद्रपूर जिल्ह्यात राजनेत्यासह पोलिस प्रशासन पण गप्प असुन जिल्हयात दारू विक्री सऱ्हासपणे विक्री होत आहे . काही – काही तालुक्यात तर दारूबंदी जिल्हयात सुरू असलेले बार पाहवयास मिळत आहे . असाच प्रकार चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी नागपुरहुन येत असलेली 9 वाहनांपैकी 7 वाहने पकडली . त्यापैकी दारू भरलेली 2 वाहने ही पसार झाल्याने आमदार यांनी चंद्रपूर लोकल क्राईम ब्राँच यांना फोन करून कळविले असता त्यांनी त्यांना उलट – सुलट उत्तर दिल्याचे प्रसार माध्यमातुन सांगितल्यानंतर लोकांना माहित झाले . परंतु हा प्रकार पोलिस प्रशासनाला बदनाम करण्यासाठी करत आहे का ? ज्या पडोली ठाण्यात या दारू भरलेल्या वाहनांना पकडण्यात आले होते हे कार्यक्षेत्र पडोली पोलिस ठाणेदार मुरलीधर कासार यांच्या हद्दीत येते . तर मग फक्त आमदार साहेबांनी चंद्रपूर एल.सी.बी. च्या बाळासाहेब खाडे यांना कोणत्या उद्देशानी फोन केला ? संपुर्ण चंद्रपूर जिल्हयात दारू कुणाच्या आशिर्वादाने जिल्हयात येत आहे . हे संपुर्ण जिल्हा वासियांना माहिती आहे . तरी पण जिल्हयातील नागरीक त्यांनाच निवडुन देतात . हे चंद्रपूर जिल्ह्याचे दुर्भाग्य म्हणावे लागणार . तसेच आमदार साहेबांनी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील लोकांना विज बिल 200 युनिट मोफत करू म्हणुन निवडणुकीच्या पत्रात नमुद केले होते , पण त्यांचे एक वर्ष पुर्ण झाले तरी सुद्धा 200 युनिट तर सोडा चंद्रपूर च्या जनतेला विज बिलात 20 % वाढ होऊन सुद्धा आमदारसाहेब झोपुन आहेत हे चंद्रपूर वासीयांचे दुर्भाग्य . 200 युनिट सोडुन आता चंद्रपूर जिल्हयामध्ये दारू येऊ देणार नाही असे म्हणतांना आमदारसाहेब दिसुन येत आहे . तरी सुद्धा ज्या 7 दारू भरलेल्या वाहनांना पकडुन पडोली ठाण्यात जमा केले आहे , मग त्या दारू विक्रेत्यांचे नाव व दारू आली कुठून हे त्यांनी का जाहीर केले नाही , यामागील काय उद्देश असावा देव जाणे ! पण मागील 15 दिवसापासुन आमदारसाहेब दारू विक्रेत्यांच्या मागे आहे . तर त्यांना माहित नसणार का ? ही दारू कुठून आली व चंद्रपूरला कुठे जाणार ? आमदार साहेबांनी प्रसार माध्यमातुन चंद्रपूर एल.सी.बी. निरक्षक बाळासाहेब खाडे यांचेवर आरोप लावले ते कितपत योग्य आहे ? जेव्हा की आमदार साहेबांनी स्वत : दारूनी भरलेल्या वाहनांना पकडले होते . आणि ते पडोली ठाण्याच्या हद्दीत तर मग चंद्रपूर एल.सी.बी. चे या प्रकरणी काय घेणे – देणे होते . या विषयावर आमदार साहेबांनी स्पष्टीकरण द्यावे . ही पत्रकार परिषद जिल्हा अध्यक्ष सोहेल शेख च्या मार्गदर्शनाखाली उपस्थित सं.पा. शहर अध्यक्ष तनशिल पठाण , अब्दुल राझिक , सद्दाम हुसेन , यांच्या उपस्थितीत घेण्यात आली .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular