Wednesday, October 4, 2023
Homeचंद्रपुरमोदी विकासाचा 'एप्रिल फूल' दिवस साजरा !

मोदी विकासाचा ‘एप्रिल फूल’ दिवस साजरा !

राष्ट्रवादी काँग्रेस चे अभिनव आंदोलन….

चंद्रपूर/विदर्भ कल्याण
पेट्रोल डिझेल व गॅस तथा जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव लक्षात घेता केंद्र सरकारच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने १ एप्रील ला बल्लारपूर नगर परिषद चौक येथे मोदींच्या ‘अच्छे दिन’ च्या पोकळ आश्वासना विरुद्ध १ एप्रिल चे औचित्य साधून महागाईचा अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला.


‘विकासाचा’ जन्मदिवस म्हणजेच एप्रिल फुल दिवस असे म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई यांच्या आदेशानुसार १ एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एप्रिल फुल दिवस म्हणजे प्रधानमंत्री मोदींच्या विकासाचा जन्मदिवस घोषणा बाजी करत साजरा केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. राकेश सोमाणी यांच्या हस्ते या वाढती महागाई आणी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. वाढती महागाई, बेरोजगारी, खोटे जुमले या मोदींच्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर उपस्थीत कार्यकर्त्यांनी एकमेकांना मोदी महागाईच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्रवादी बल्लारपूर युवक शहर अध्यक्ष अमर धोंगडे, उपाध्यक्ष अजित पडवेकर,सुमित(गोलु)डोहणे, आदिवासी विकास सेल चे अध्यक्ष भाग्यवान मेश्राम, संस्कार सुखदेवे, राहुल रामटेके, शुभम मेश्राम, शिवम दुपारे,प्रथम अड्रस्कर,रितेश अलोने,अमोल वासेकर, सौरभ ढोदरे,अमर रहीकवार,चेतन भोगले,मनीष भरमेया,बबलू भाई पठाण, नंदू पाल, रिक्की कैथवास, लालू शेंडे, यश देवगड़े, गुरू कामटे, इम्रान खान, व अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular