Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरमृतकाचे नातेवाईकांना नामदार विजय वडेट्टीवार यांचे कडून आर्थिक मदत

मृतकाचे नातेवाईकांना नामदार विजय वडेट्टीवार यांचे कडून आर्थिक मदत


सावली (मृत्युंजय रामटेके )
बोथली येथील युवक नामे सुनील राघोलू मुठावार याचे दिनांक 21फेब्रुवारी 2021 ला सायंकाळी अचानक निधन झाले होते, ते 30 वर्षाचे होते त्याच्या पच्यात 1 वर्षाचा मुलगा, वृद्ध आईवडील, पत्नी असा आप्तपरिवार आहे
अतिशय उमदे युवक मरण पावल्यामुळे घरी शोककळा पसरली घरचा कमविता व्यक्ती निघून गेल्यामुळे आर्थिक दृष्टी ने कुटूंब खचलेले होते, ही बाब राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, तथा जिल्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्या लक्ष्यात आणून देण्यात आली.


सदासर्वकाळ लोकांच्या मदतीला धावून जाणारे, मदत या शब्दाची खरीखुरी जाणीव असणारे विजय भाऊ वडेट्टीवार यांनी तत्काळ मृतकांच्या कुटीबीयांना पाच हजार रुपयांची मदत पाठविली.
सदर मदत गावचे प्रमुख कार्यकर्ते नरेश पाटील गड्डमवार, तालुका काँग्रेस चे सरचिटणीस तथा संजय गांधी निराधार समितीचे सदस्य नितीन गोहणे, हिरापूरचे उपसरपंच शरद कंनाके, युवक नेते संजय सायंत्रावार, केशरी पाटील मुंघाटे, विलास वाळके, अरविंद मुद्दावार, विनोद बलीगवार, मनीष बद्दमवार, मोतीराम कपाटे, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये देण्यात आली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular