Tuesday, June 28, 2022
Homeचंद्रपुरमाननीय नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांचे कडून गुणवंत विद्यार्थी ला आर्थिक मदत...

माननीय नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांचे कडून गुणवंत विद्यार्थी ला आर्थिक मदत ……

सावली (मृत्युंजय रामटेके )


राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांनी एका गुणवंत विद्यार्थी ला आर्थिक मदत करून त्याला जयपूर ( राजस्थान )येथे जाण्यास 10 हजाराची मदत करून दिलासा दिला.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोखाळा येथील युवक नामे शुभम लाटेलवार हा विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून b sc परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला अशातच त्याने malviya national institute of technology जयपूर या संस्थे मार्फत घेण्यात येणाऱ्या M sc रसायनशास्त्र पात्रता परीक्षेची तयारी केली व उत्तम गुण घेऊन त्याने यश संपादन केले
मात्र घरची परिस्थिती अत्यंत बेताची, शेतमजुरीवर काम करणाऱ्या वडिलांकडे मुलाला उच्च शिक्षणासाठी पाठविण्यास पैसे नव्हते, दरदिवसाच्या रोजीवर पोट भरणे हा दैनंदिन जीवनातील काम, अश्या परिस्थितीत जयपूरला पाठविणे कठीण होते अश्या परिस्थितीत शुभमच्या वडील रमेश लाटेलवार यांनी जिल्हा खनिकर्म विकास महामंडळ चे सदस्य दिनेश पाटील चितनूरवार,काँग्रेस चे कार्यकर्ते अनिल म्हशाखेतरी व तालुका काँग्रेस चे सरचिटणीस नितीन गोहणे, केशव भरडकर माजी सरपंच व्याहाड , संदीप जुनघरे उपसरपंच मोखाळा,वनिता भोयर ग्रा.प. सदस्य,गणेश चापले ,सुनील नलुरवर , महेश रायपुरे यांनी सदर बाब लक्ष्यात आणून दिली
सदर बाबीची पूर्ण कल्पना माननीय नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांना देण्यात आली त्यांनी मुलांची मेहनत व अभ्यासु वृत्ती पाहून तत्काळ दहा हजार रुपयांची मदत केली व पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च करण्यात येईल असे सांगितले
विजय भाऊ वडेट्टीवार हे खरे लोकसेवक आहेत अशी प्रतिक्रिया शुभमचे वडील रमेश लाटेलवार यांनी दिली
दरम्यान विजय भाऊ वडेट्टीवार यांचे घरी जाणारा कोणताही माणूस संकटात सापडला असेल त्याला मदत होते अशी चर्चा जी केली जाते ती पुन्हा एकदा स्पष्ट पणे दिसुन आली आहे
एका गरीब गरजू विद्यार्थ्यांला मदत केल्यामुळे शुभमचे आयुष्य आता जनसेवेसाठी राहावे अशी परीसरात चर्चा होत आहे

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular