सावली— महाराष्टाचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी मा.सा. कन्नमवार यांच्या जयंती निमित्य सावली शहरातील कन्नमवार चौकातील त्यांच्या पुतळ्यास जिल्हायाचे पालक मंत्री विजय वड्डेटिवार यांनी मार्लापण करुन अभिवादन केले..

चंद्रपुर जिल्हायातील मुल तालुक्यातील रहिवासी असलेले मा. सा. कन्नमवार हे महाराष्टाचे दुसरे मुख्यमंत्री होते ,अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी या पदावर विराजमान होणे हि तालुक्यासह जिल्हायाचा अभिमान आहे , त्यांची प्रेरणा हि आमच्यासाठी नेहमीच मार्गदर्शक म्हणुन कार्यरत राहिल असे यावेळी पालकमंत्र्यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले
यावेळी युवक काँग्रेसचे नितीन दुवावार, संदीप पुण्यपवार, माजी न.प.उपाध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले,चंद्रकांत गेडाम, प्रितम गेडाम,मनोज चौधरी सुनिल ढोले , मृणाल गोलकोंडावार, आदी कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते