माजी उपसरपंच गोकुळदास कार यांची मागणी
ब्रह्मपुरी तालुक्यातील मंगली येथे सन दोन हजार सतरा अठरा मध्ये मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण झालेले असून अद्यापही विद्युत कनेक्शन जोडण्यात आलेले नसल्याने मांगली गावात समोर उन्हाळ्याच्या दिवसांचा धोका लक्षात घेता भीषण पाणीटंचाई भासत असल्याचे विदारक चित्र वास्तव्यात समोर येत आहे या मागणी संदर्भात वारंवार पाठपुरावा व पत्रव्यवहार करून सुद्धा शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे.

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे मार्फतीने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत (डीपीडीसी) विद्युत कनेक्शन करिता ६२७३५८ रुपये कनेक्शन करता मंजूर करण्यात आले तरीपण आज पर्यंत विद्युत कनेक्शन जोडला गेलेला नाही त्यामुळे मांगली गावात पाण्याची टंचाई भासत आहे या मागणीकडे माननीय मंत्रीमहोदयांनी लक्षात घेता त्वरित लक्ष देऊन मांगली गावात भेडसावणारी पाण्याची समस्या ताबडतोब दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांतर्फे माजी उपसरपंच गोकुळदास कार यांनी पत्रकातून केली आहे.